श्रद्धांजली पॅरिस......
श्रद्धांजली पॅरिस......१५/११/१५
शहरे, महानगरे, रस्ती उदंड फिरतोय जणू मृत्यूचा अवतार |
पुन्हा पुन्हा कसा घालतोय हा इसीस राक्षस मानवावर वार |
ओलीस जन, हाथ चिमुकले, कसे करती बेछूट गोळीबार |
देशोदेशी वणवा पेटला अधार्मिक, दांभिक चोहीकडे ललकार |
कोण सुरक्षित नुरले कुठे, उपसले घातकी घातपाती हत्यार |
बिमोड व्हावा कि सवयीचा करावा आम्ही हा रोजचाच थरार |
पेटावे युद्ध कि बात करावी अगदी अनुल्लेख हे उद्गार |
मुंबई, सिडनी, पॅरिस अजून किती पाहणार रक्तिम हे शृंगार |
विकसित देश, पुढारले देश परी दुबळ्या नीती चा स्वीकार |
कसा वाढला अंतर्गत अचानक, शोध खदखद आतंकी प्रहार l
ठेचावा हा क्रूर दानव, संपवावा कायमचा हा निर्दयी फुत्कार |
माखवावी रक्ताने धरती, नाही नाही कुणासही हा अधिकार |
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment