Skip to main content

Posts

Featured

जागतिक पुस्तक दिवस आणि शेक्सपियर दिवस

जागतिक पुस्तक दिवस आणि शेक्सपियर दिवस   आज नकळत हात कीबोर्ड आणि संगणककडे सरसावले. कारणही तसे विशेष म्हणावे लागेल कारण पुस्तक दिवस आणि इंग्रजी साहित्याचे दैवत शेक्सपियर यांचा जन्मदिवस असे एकत्र म्हणजे सुवर्णयोगच. इंग्रजी विषय म्हटलं की नकळत समोर उभा राहतो एक साहित्यिक वटवृक्ष आणि तो म्हणजे शेक्सपियर. इंग्रजी विषय अभ्यासणारेच नाही ते इतरही वाचक येथे नतमस्तक होतात. शेक्सपियर यांनी रेखाटलेली पात्रे अजरामर झाली आहेत. त्या साहित्य सागरात एकदा डुबकी मारली की अनंत काल तसच डुंबत रहावं इतका तो खोल आणि मनोहर आहे.  शेक्सपियर यांनी रेखाटलेल्या शोकांतिका इतक्या जबरदस्त आहेत की त्या सुन्न करून टाकतात. मग तो Othello असो, Macbeth असो, King Lear असो अथवा अप्रतीम Hamlet असो.  नायक जेंव्हा दुर्भाग्याचा शिकारी बनतो, जेंव्हा एक विशाल कर्तृत्ववान नायकाचा करुण शेवट होतो आणि त्या अपूर्ण सत्याला शेक्सपियर इतके चपखल मांडतो की मनावर राज्य करून जातो तो नायक.  आम्ही एम.ए. ला असतांना वाचलेला आणि समजलेला नायक आणि खलनायक Othello आजही तसाच आहे. आयुष्यात कधीही न विसरावा असा पाठ पक्का झाला. त्या नायकाची कधी चीढ यावी तर क

Latest posts

वाढदिवस विशेष तृप्ती

तृषार्त पथिक भाग १ ( २०/३/२१ )

लेखाजोखा २०२० (भाग ३)

लेखाजोखा २०२० (भाग २)

लेखाजोखा वर्ष २०२० (भाग १ )

थंडी आणि अलार्म २८/११/२०२०

Superheroes…I wish I were you (7th September, 2020)

हतबलताच नाही का? ७/९/२०२०

Gone are the days….23/8/2020

होय ,मी ऑनलाईन काम करतोय