अविरत सेवा तिची ...१०/२/ १६
अविरत सेवा तिची ...१०/२/ १६
माझी बाईक ... ड्रीम युग गेली कित्येक दिवस मला जणू सांगत आहे तिची अवस्था ,तिची हुकलेली सर्विसिंग, तिचे वेगवेगळे आवाज जणू साद घालत होते, आज ती आर्त हाक जरा तीव्र वाटली अन ते शब्दांकित करण्यास मला भाग पाडले . तिच्याशी झालेला हा मूक संवाद ....
वर्षे तीनच वय तुझं पण जरा जपलंय तू तुझं नवपण |
मी करतो इशारा अन तू चालते जणू अवखळ बालपण |
साथ देते दिस हरेक मजला अन पाळते धर्म क्षणोक्षण |
जणू सन्मान मालकाचा नमूद फक्त सेवेतून मनोमन |
जरा दुर्लक्षच झालंय हल्ली, देतय आवाज तुझं आजारपण |
“फिटर फिटर” जणू आकांत तुझा, रोजची करुणशी तणतण |
पोहोचलाय त्रास तुझा येथे हतबल माझ्या वेळेची गनगन |
थांब जरा मोक्याने घे, शमव वाजती खुळखुळे अन झनझन |
घेशील भरारी पुन्हा, अवतार नवा, घे पुन्हा तू नवे अवसान |
चमकले रुपरंग नव्याने, पुन्हा नव्याने घेशील तू ही उत्थान |
दे तोच जोश, तोच उत्साह अन तेच गतीमानतेचे वरदान |
पुरवेल लाड ग्रीस,ऑइल चे, होऊ दे पुनश्च रूप गतिमान |
- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment