नाती अन जिव्हाळा ..

नाती अन जिव्हाळा ............... २३/४/१७

या खचाखच भरलेल्या जगात जिथे आमचा देश १३५ कोटीच्या घरात आहे, शहरे तुडुंब जन्संख्येने भारत आहे. तालुके आणि जिल्हे सोडा, आमची गावं सुद्धा व्यस्त झालेली पाहायला मिळत आहेत. गावातही फक्त काम आणि काम हाच राम मानला जाऊ लागलाय. या सगळ्यामध्ये गुगल ने पहिले तर आपण फक्त कृमी किटक आहोत हे नक्की. आता हा झाला नकारात्मक भाग. हाच एक किटक ठीक चालला तर तो देशाचा पंतप्रधान होतो, एक महान नेता देखील बनतो. हे झाले अद्वितीय लोकांचे. जे सर्वसामान्य गणतीत मोडतात ते मात्र किती खोल रुतले असतात या सर्व गर्तीमध्ये की दिवस कसे पार पडतील? या सगळ्यात मद्द करते ती नाते संबंधाची दोरी.

हो, नाते संबंध आणि मैत्री यांचे अनोखे आणि मनोहर विश्व सर्वांनाच सांभाळता येईल असे नाही. रोज शेकडो लोक आजूबाजूने पसार होतात. अनेकजण हाय हेल्लो करतात. पण कुणीही एकदम घनिष्ट होत नाही. इतकंच. एखादे घर बांधतांना निर्जीव वीट आणि धुरकट सिमेंट जो पर्यंत पाण्याचा ओलावा घेत एकजीव होत नाही तोपर्यंत एकही इंच काम होऊ शकत नाही. सुंदर बागेत उमलणारी फुले सुध्दा नशिब घेऊन येतात. काही देवाच्या चरणी, काही नेते मंडळीच्या गळ्यात, काही दारावर तर काही थेट तिरडीवर जातात. मग जिथे पडलो तिथे नशीब रचिले आहे विधात्याने असे मानत स्वीकार करावा कि झालेल्या गतीचा धिक्कार?

विचार केला तर कळेल कि एका मिळालेल्या विश्वात व्यक्ती स्वत:ला गाडून घेतो. त्यातच तो आपली नवी , आगळी वेगळी दुनिया शोधतो. त्यातल्या सगळ्या उणीवा बाजूला ठेवत, मनाला समजावत एकरूप होण्याचा प्रयत्न करतो. यात सर्वात महत्त्वाचे ते म्हणजे व्यावसायिक जग सांभाळताना फक्त शुष्क आणि मुर्दाड बनत जगण्यात ज्यांना रस आहे त्यांसाठी हि दुनिया नाहीच मुळी. फक्त विरंगुळा, टाईम पास मध्ये वेळ घालवणारे वेगळे.

इथे व्यक्ती व्यक्तीशी भेटतो तो काही वेगळ्या भावाने. विधाता उगाच का वेगळ्या स्वभावाच्या, नामाभिधानाच्या लोकांना विशेष यत्न करून एकत्र आणतो. पहा न कोण कुठला? कसा काय एकत्र आला? कसे स्वभाव गुण जुळले? या सगळ्या बाबी काहीही करू शकतात. आपोआप कधीही कुणातही सलोखा उभा राहत नाही. एक अनोखे नात्यांचे विश्व उभे करताच त्यात बरेच अडसर उभे असतात. किती भावनिक, बौध्दिक आणि मानसिक प्रहार होतात आणि त्यातून तापून सुलाखून निघतात ती नाती. अनेक वळणावर धडपडतात आणि अवघडतात नाती. कच्ची पक्की जशी बनते तशी नात्याची बात बनते. अर्थात नाते हळुवार फुलत जावे अन नकळत ते काळजाचे ठोके बनावे.


अश्या काळजात खोल रुतलेल्यांना आणि हा संबंध जपणाऱ्याना सलाम अन ऑल द बेस्ट |



--- सचिन गाडेकर

Comments