प्रमोद आणि अर्चना वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस (२ जानेवारी )

प्रमोद आणि अर्चना वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस (२ जानेवारी )
आज डॉ प्रमोद आणि अर्चना वहिनी यांच्या लग्नाचा वाढदिवस. धन्यो गृहस्थाश्रम | 
तुम्हा दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खूप खूप अभिमान आहे तुम्हा दोघांचा. आयुष्य सुंदर आहे कारण आपण ते सुंदर बनवू शकतो या उक्तीचा आभास या दोघांकडे पाहिले ते नक्की होतो. आयुष्यात खूप वेळा मागे वळून पाहिले की काही गोष्टी ठळक प्रतीत होतात.  त्यातील माझ्या आणि तृप्तीच्या आयुष्यात या दोघांचा तो सुवर्णक्षण कायमचा कोरून ठेवला आहे आम्ही. उभ्या आयुष्यात सगळी नाती मिळाली आम्हाला त्या दिवशी. या दोघांना आज विचारणे ठीक होणार नाही की का एवढा उशीर केलात तुम्ही? आम्हा दोघांना मिळालेलं अद्भुत गिफ्ट मानतो आम्ही. १ तारखेला हळद झाली. दोनला तर सगळं पार पडल. आठवतय का तुम्हाला? बाकी काही सांगत नाही कारण ते अगदी स्पष्ट असेल डोळ्यासमोर आजही. अगदी थोडक्यात सांगायचे तर छोट्याश्या घरात मोठेसे स्वप्नाने जन्म घेतला आणि प्रवास सुरु झाला.  धन्यो गृहस्थाश्रम |
किती सुंदर आयुष्य आहे हे. जेवढे समजू तेवढे हलके होत जाते. तुम्ही दोघांनी हे इतकं सुंदर करून दाखवलं आहे की कसं सांगू? तुम्हाला भेटून नेहमी उर्जा मिळते कारण संघर्ष करून काही मिळाले त्याचे काय महत्त्व असते हे तुमच्या शिवाय कोण समजणार म्हणा? दो दिवाने वगैरे वगैरे म्हणतात ना अगदी तसे. ईश्वराने जेव्हा गाठी बांधल्या असतील ना तेव्हा त्याने काही विशेष लोभ, विशेष प्रेम आणी विशेष यत्न केला असेल तुम्हाला एकत्र आणताना. दोन वेगळ्या क्षेत्रातली दोन व्यक्ती आहेत मात्र एकजीव आणि एकरूप असे आहेत की विधाता सुद्धा खुश असेल रे.  धन्यो गृहस्थाश्रम |
तुम्ही दोघेही आज मागे वळून पाहताना किती चकित होत असाल ना? कुठून कुठे आलो आपण? कधी कधी विचारही केला नसेल असे प्रेम ईश्वराने दिले. तुमच्या नात्यात तर त्याचे विशेष लक्ष तर आहेच पण त्याने अगदी मनावरच घेतले आहे की जेवढी वर्षे हळूच पसार झाली किंवा हुकली ती भरून  निघावी. भौतिक गरजा आणि संसारिक बाबी याबाबत प्रगती तर होणारच आहे आणि ती होतच रहावी. या प्रवासात मध्ये मध्ये मिळणारी यशाची छोटी छोटी प्रेमपत्रे किती मस्त असतात असतात आणि तुम्ही ती सेलिब्रेट करत समजून ही घेतात. त्याच्या प्रेमाचा वर्षाव होत आहे आणि तुम्ही ते प्रेम समजून अजून जबाबदार झाला आहात हे सांगायलाच नको. खूप समंजस आणी म्याचूअर व्हायचं नाहीय आपल्याला पण तुम्ही एक मिसाल आहात बऱ का. मागे तुझ्या वाढदिवसाला लिहील होतं ते पुन्हा सांगतो की उभ्या जगाशी  फाटाफूट करत मिळवलेलं प्रेम किती भक्कम आणि सार्थ होत हे आम्ही डोळ्याने पाहत आहोत आज.  धन्यो गृहस्थाश्रम |
आता तर कुटुंबात एक नवीन सदस्य आला आहे आणि आयुष्य आणखी गोड झालेले दिसते आम्हाला.  सुखांना आपल्याकडे यावसं वाटतं, रहावसं वाटतं यात आनंद आहे. याज्ञिका तर नशीबवान आहे बाबा. हा प्रेमवर्षाव कुठही थांबणार नाही याची खात्री आहे मला. तुम्ही कोठेही कमी पडत नाही आहात यात आयुष्याचे गमक आहे. असेच खास रहा एकमेकांसाठी, आमच्यासाठी आणि या नव्या गोंडस बच्चुसाठी. धन्यो गृहस्थाश्रम |
तुम्हाला दोघांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा |

--- स्वधा, स्वरूपा, तृप्ती आणि सचिन

Comments

Post a Comment