हतबलताच नाही का? ७/९/२०२०
हतबलताच नाही का? ७/९/२०२०
कोणी आजार तर कोणी चक्क बाजार म्हणतो ह्यात
आज हजार ऐशी उद्या नव्वद अशी संख्या गणतो त्यात
आरोग्यव्यवस्था की लोकसंख्या?
शेवटी हतबलताच नाही का?
मिडिया आमचा २४ तास करतोय रिया आणि सुशांत
पूर, कोरोना, बेरोजगारी वा अर्थचक्र सगळं जणू भ्रांत
टी आर पी च खेळ?
हतबलताच नाही का?
जीडीपी खोल घसरला त्यात माझ्या देवाचा म्हणे हात
करणी झाली, चेटूक झालं, कशाने हो आता टाकेल कात
ज्याने त्याने आपलं पहावं म्हणण?
हतबलताच नाही का?
प्रजा सारी अजूनही भेदरून कधी सावरून आहे घरात
दोन वखुताच का होईना टाकावे लागेलच ना पोटात
जीवावर उदार होणं पोटासाठी ?
हतबलताच नाही का?
झालेलं सर्वंकष नुकसानिची नकोच कराया बात
ठाऊक आहे आपलेच ओठ आणि आपलेच दात
तोंड दाबून मार बुक्क्यांचा ?
हतबलताच नाही का?
--- डॉ. सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment