...खूप दिवसांनी  1/10/15

...खूप दिवसांनी  1/10/15
 

टाकलंय दान जणू भरभरून त्यान
घेतलंय वाटतंय आज मनावर त्यान
दिला उसासा अन किरण नवा आशेचा ....खूप दिवसांनी

दिसली किनार सोनेरी काळ्या ढगावर
उदार झाला काय  राजा आज प्रजेवर
चिंता, भय अन तणाव जसे सोडले रजेवर  ....खूप दिवसांनी

होईल नवे काही घडेल काही झाला भास
घेता येईल सोबत्यांस मोकळासा श्वास
नव्या उमेदीची मनी लागली नवी आस ....खूप दिवसांनी
 

वाहू लागलीय  जणू नवी मंत्रमुग्ध हवा
खेळ नवा, नियम नवा, राजा आता नवा
मित्र तत्वज्ञ वाटाड्या सा होणार मितवा ....खूप दिवसांनी

Comments