विषय वेगळा आहे ...
विषय वेगळा आहे ...
कोणी नाम सद्भावनेने घेऊन बळीराजास देतोय हा हात
म्हणतोय उद्दाम कोणी रस्त्यावरील कुत्र्यास मारा लात
आहोत आपण बिझी तसाही मदद बिदत विषय वेगळा आहे ...
कोणी परत करतय म्हणे व्यथेने दिलेला साहित्य पूर्ण सन्मान
कळेना कसे कुठून अचानक आले विद्वानांत संवेदना न अवसान
आहोत शांत आपण तसाही विरोध बिरोध विषय वेगळा आहे ...
फक्त दोनशे कारणीभूत बनतात गरीबास जीवन संपवायला
राजरोस म्हणे समित्या या गरिबीच्या पुसट रेषा मोजायला
आहोत निवांत आपण तसाही दुष्काळ बिष्काळ विषय वेगळा आहे ..
Comments
Post a Comment