शब्द भर जरा प्रेमाने बोल... ६/१२/१५
शब्द भर जरा प्रेमाने बोल... ६/१२/१५
बघ वारे हे वाहते
बदलाचे |
अंदाज घे थोडेसे
भवतालचे |
जाण मर्म जरा मोजकेच
बोल |
जरा समजून कर विचार
खोल |
फक्त शब्द भर जरा प्रेमाने बोल.. ||१||
छत्र फाटते मग
जुन्या आधाराचे |
आस डोळ्यात अन भाव
उधाराचे |
का चुकते पाऊल जातोय
बरा तोल |
का विसरलाय तू तुझेच
खरे मोल |
फक्त शब्द भर जरा प्रेमाने बोल.. ||२||
दुरावती आपलीच अन
परक्याचा लोभ |
प्रसन्न कोणी अन
उसळतोय कुठे क्षोभ |
नात्यांचा गुंता अन
सोडव जरा झोल |
पटकाव कधीतरी खलनायका
हिरोचा रोल |
फक्त शब्द भर जरा प्रेमाने बोल.. ||३||
--
सचिन गाडेकर
Comments
Post a Comment