नरेंद्रा शांतवन कर जा....

नरेंद्रा शांतवन कर जा .... 7/12/15

नको पडाया कोणी धर्मांधांच्या भक्षी |
नको ओकाया गरळ साधुमहाराज साक्षी |
देश,विकास फक्त असू दे तुझ्या लक्षी |
बेताल बडबडी मथुरेचे वृंदावन कर जा |
नरेंद्रा शांतवन कर जा ....

कुणाला हवे गोडसे कुणाला चर्चेला गोमांस |
पराभव शिकवतो झाला उठाठेवीचा त्रास |
दिसू देत जमिनीवर तुझा प्रयास अन ध्यास |
ज्येष्ठ सहकारी नाराज जरा बोळवण कर जा |
नरेंद्रा शांतवन कर जा ....

झाला स्वच्छ भारत किती परत घ्यावा थोडा शोध |
जनधन झाले यशस्वी किती मिळू दे सर्वाना  बोध |
मांड ठोकताळा मोकळा स्पष्ट दिसेल अर्थपूर्ण नोंद |
होऊ दे चर्चा अन का नसावी तिथे बोलघेवडी घोळवण |
नरेंद्रा शांतवन कर जा ....

आहेत गगनापरी तुजपरी देशाला अपेक्षा बहू |
नको चमत्कार पुरता भले वाट वर्ष पाच पाहू |
द्यावा वाटा समान अन नको नुसताच बाऊ |
बोहल्यावरच्या मित्रांना एकदाच केळवण कर जा |
नरेंद्रा शांतवन कर जा ....


करतोस नित्याने यशस्वी परदेशाटन |
नव्या नव्या योजना अन उद्घाटन |
मेक इन इंडिया चे जगाला आवतन |
नको विखारी भाष्य फक्त योग्य भलामण कर जा |
नरेंद्रा शांतवन कर जा ....



Comments