राहुट्या

राहुट्या 11/11/17

वाढता थंडीचा पारा होता एका शेतालगत ।
तिथेच उभारून राहुट्या उभं आहे एक जगत ।

सांज झाली आणि पेटल्या चार चुली एकसोबत ।
आला घरधनी खेळत लेझीम आणि पुरता झिंगत ।

लेकरं झेपावली मागत चॉकलेट, खाऊचा कागद ।
चाफती खिसे आशेने लेकरे भूक पोटी वर्षे ओसांडत ।

ना माया त्यासी ना लळा,मुखी देही वास देशी संगत ।
वाढ जेवायला तिला म्हणे साली काय आहे आज पंगत ।

ती ही मग बसा म्हटली देत दोष बापा आपल्या  दिवंगत ।
का वाटोळे केले का गाठ बांधली माझी या नरभक्षी संगत ।

तो ही नामर्द परत फिरला पुन्हा तिच्यावर दोन हात टाकत ।
कुरवाळत लेकरं ती पीडित चुलीवर  पुन्हा बैसली  रांधत ।

-- सचिन गाडेकर

Comments