*#Surgical Strike 2* ये नया भारत है| २६/०२/१९

*#Surgical Strike 2* ये नया भारत है|  २६/०२/१९

सर्वप्रथम  भारतीय वायुसेनेचे मनापासून आभार| 
गेल्या पंधरवाड्यात पुलवामा येथे झालेला अतिरेकी हल्ला झाल्यापासून प्रत्येक भारतीयाची भावना अशीच कशी होती. ज्या पद्धतीने ४० जवान आणि ताफयावर भ्याड हल्ला झाला होता तो भयंकर होता आणि सैनिकांचं मनोबल उंचावणं खूप गरजेचं होतं. शेजारधर्म विसरलेला शेजारचा देश जेवढा पैसा भारताविरुद्ध गरळ ओकण्यात आणि आतंकवाद्यांना पाठबळ देण्यात घालवतो तेवढ्यात देश किती पुढे जाईल हे कसे समजावे? एकामागून एक हल्ले आणि त्या मागची भीषण दाहकता दर वेळी फक्त मेणबत्त्या आणि निषेध नोंदवून गप्प व्हायची. पठाणकोट आणि उरी झाल्यानंतर दिलेला कडक सर्जिकल स्ट्राईक एक अभूतपूर्व पाऊल होते.सर्जिकल स्ट्राईक करून जो संदेश  आपल्या देशाने दिला तो कळण्याइतपत बुद्धी असती तर अनेक प्रश्न सुटले असते. स्वत:च्या देशाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढायचे सोडून आतंकवादी अड्डे आणि संघटना यांना खतपाणी घालत पाकडे नापाक हरकत करतच आले.

पुलवामा तर काळीज छिन्नभिन्न व्हावं असा हल्ला होता. ४० जवानांचे पार्थिव पालम विमानतळावर पाहून डोळे पाणावले आणि मनात एकच आग होती. एखादा देश  इतका कसा सहनशील असू शकतो? अशा  कोणत्या मर्यादा आहे? कोणते आंतरराष्ट्रीय दबाव आहेत जे आपल्याला आपल्या मातृभूमीची रक्षा करण्यासाठी रोखत आहेत? अशी कोणती मजबुरी आहे? मन फक्त उत्तर मागत होते. खून का बदला खून असे का नाही केले जात? का आतंकी अड्डे, ट्रेनिंग कॅम्प माहित असून देखील आपण लाचार, हतबल आणि कमजोर दिसतो?

याला उत्तर मिळाले सर्जिकल स्ट्राईक ने. राजकीय इच्छाशक्ती आणि कणखर नेतृत्व खऱ्या अर्थाने बळ भरते सैन्यामध्ये. प्रत्येक सैनिकाच्या मनातली आग आज फुटली विमानाने. थेट सीमा ओलांडत आतंकवादी अड्ड्यावर मिराज फायटर वापरत थेट वार केला. १२ मिराज सारखे फायटर थेट शत्रू खेम्यात घेऊन जाणे. थेट हल्ला करत शिताफीने परत आले यासाठी भारतीय वायू दलाचे करावं तेवढं कौतुक थोडं आहे. खऱ्या अर्थाने त्या ४० जवानांच्या कुटुंबाना, या देशातील प्रत्येक नागरिकाला याची प्रतीक्षा होती. 

कोण कुठला तो भेकड देश, कोण कुठल्या त्या संघटना आणि कोण कुठले ते फुटीरतावादी .. या सर्वाना असाच धडा शिकवायला हवा. एक नाही अनेक वेळा करावा. जर आमच्या शेजाऱ्याने  त्याच्या अतिरेक्यांना सावरले नाही तर आजचा हल्ला एक ट्रेलर आहे असे समजा.

आपल्या सर्वांसाठी सर्वात पहिले देशाची सुरक्षा आणि अखंडता हीच अग्रिमता असायला हवी. पुलवामा आतंकवादी हल्ला झाला तेंव्हापासून काळजात घुसलेली कट्यार आज काहीशी मोकळी झाली. वेदनेच्या भाराने  जड झालेले काळीज आज जरासे हलके भासत आहे. काहीशी हळवी झालेली मनाची बाजू सावरत आहे. डोळ्यात आलेली आग थोडी शमत आहे. आजचे प्रत्त्युत्तर हा गंभीर इशारा समजत पाकड्यांनी लवकरच कुरापती बंद कराव्यात अथवा पुन्हा थेट घुसून होत्याचे नव्हते करील हे समजावे.

केवळ निषेध आणि धिक्कार आता विसरावे लागेल. कोणी जर माझ्या मातृभूमी आणि सैन्याशी पंगा घेतला तर असे स्ट्राईक वारंवार करत त्यांच्या नांग्या ठेचल्या जातील हा आजचा इशारा आहे. या अश्या कठोर आणि कणखर पाऊलांना उचलण्यासाठी जबरदस्त परिश्रम घेतले गेले असतील. स्वत: तिन्ही दलांचे प्रमुख यांचे एकमत आणि त्यांना सर्वाधिकार ही नांदी होती.  याचसोबत सर्व गुप्तचर यंत्रणा, अधिकारी, संरक्षण मंत्रालय, जेम्स बॉण्ड अजित डोवाल आणि प्रधानमंत्री आपल्या सर्वांचे देखील आभार.

*#ये नया हिंदुस्तान है ये घर में घुसेगा भी और मारेगा भी |*

-- सचिन गाडेकर

Comments