वाढदिवस विशेष हितेंद्र पगार


वाढदिवस विशेष हितेंद्र पगार  

आज हितूभाऊ यांचा वाढदिवस.... हितेंद्र पगार योगाचार्य, संगीताचार्य, गायनाचार्य आणि अजून बरेच नाव आहे त्याची. आता एवढी नावं  कशी आहेत हे आपण सगळेच जाणतो.

आम्ही दोघे तसे क्लासमेट नंतर रूममेट झालो. काही वेळात झालेली मैत्री नकळत घट्ट नात्यात बांधून गेली. आजही आणि 2008 पासून जी मैत्री ईश्वराने गुंफली आहे तो विशेष आहे. त्या मैत्रीच्या धाग्यामध्ये अजूनही तसाच भाव आणि तीच भावना आहे. काही नात्यांचा प्रवास खूप खास असतो. असाच  सुंदर प्रवास आहे. 

पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही (मी अप्पा , विशाल आणि हितू )एकत्र रूम मध्ये राहिलो. दोन वर्ष मास्टर इन इंग्रजी पूर्ण केले आणि पुढे निघालो.  आजच्या  दिवशी हितूभाऊंना खूप खूप शुभेच्छा कारण कष्ट काय असतात, जिद्द काय असते, माणसाचा स्वभाव किती हळवा असावा आणि आत बाहेर काही नसावा याचे उदाहरण आमचा रामदेव. आम्ही इतर तीन जण विशाल असेल, मी असेल, अप्पा  असेल आम्ही थोडी  जराशी वेगळी माणसं होतो आणि आमच्या मध्ये हा मात्र एक वेगळाच माणूस होता. त्याला प्रत्येकाला आठवत असेल की अतिशय नियमित योगासने करणे, व्यायाम करणे, सकाळी लवकर उठून अभ्यास करणे, नियमितपणे योगासने करून आम्हाला प्रवृत्त करणे (अर्थात आम्ही फार कमी व्हायचं कारण प्रमाद हे त्यामागचं कारण असेल) परंतु मित्राने हि चांगली गोष्ट करावी हा सतत आग्रह त्याचा.

संगीत हे त्याचे अमोघ अस्त्र आहे. मग ते हार्मोनियम असेल वा बासरी. हितू ने फक्त ते वाद्य हातात घ्यावे आणि सप्तसूर थेट काळजात घुसतात. त्याची हि कला इतकी खास आहे की ती उपासना आहे. एकदा त्याने पेटी काढली तर वेळ,काळ  विसरून फक्त ऐकत बसावं. त्याची बासरी तर कमाल आहे. अगदी माऊथऑर्गन  असो, तो अजब आहे.. आम्हाला तर खूप खूप वेळा त्याची वाटायचे की  देवाने काय माणूस बनवला आहे.
कधीही फक्त एकदा त्याला सांगा आणि दोन मिनिटात त्या गाण्याचे  सप्तसूर पक डून तो आपल्याला ते गाणं ऐकवू शकतो. मधे एकदा असेच रस्त्यावर फिरणारे लोक कुठलंतरी राजस्थानी वाद्य विकत होते. लगेचच महाराजांनी ते घेतले आणि दहा पंधरा मिनिटात त्याचे  तंत्र समजावून घेत आम्हाला त्यावर मस्त मधुर संगीत ऐकवायला सुरुवात केली. एवढंच नाही तर  माउथऑर्गन नावाचा वाद्य सुद्धा तो उत्कृष्ट वाजवतो .  त्याने संगीताची आवड इतकी छान त्यांनी जोपासली आहे की खूप कमी लोकांना हे असे जपता येते. खूप कमी लोकांना असं प्रेम जडतं आणि त्यातले फक्त काही लोकच असे करू शकतात. हितू ने संगीताच्या अनेक  परीक्षा दिलेल्या आहेत आणि लवकरच त्याने त्या सगळ्या पूर्ण कराव्यात अशी मनोमन इच्छा आहे.  गेल्या अनेक वर्ष आणि तो प्रयत्न करत आहे यावर माझा विश्वास आहे.

अश्या दिवशी करावे तेवढे कौतुक थोडे आहे. हितेंद्र तुझे सातत्य नेहमी प्रेरणा देते. यासाठी  खरंच कौतुक करावे तेवढे थोडे आहे.  सकाळी चारला म्हणजे चारला उठणारा माणूस,  रात्री दहाच्या ठोक्याला थेट ढगात जाऊन शांत निवांत झोपणारा माणूस.   म्हणजे त्यांना 09:55 नंतर फोन करायचा झाला तर अंगावर काटा येतो  कारण हा झोपलेला असेल तर कसं काय फोन करावा.  परंतु आता त्याने आम्हा सर्वांना सवय लागलेली आहे आणि पहाटे चार वाजता योगासन करताना दिसतो आणि ही धडपडही फार विशेष आहे. बाळा अशा अनेक गोष्टी आहेत तू करू शकतोस कारण तुला देवाने दिलेला प्रेमाचा वर्षाव आहे.

तू आता संकल्प ही केला असशीलच. सगळे छोटे मोठे संकल्प पूर्ण कर. आम्हाला तुझा खूप अभिमान आहे आणि एकच मागणी करतो की थोडा वेळ आम्हा सर्वाना देशील तुझ्या व्यस्त जीवनातून. तुझ्या जन्मदिनी धनु वहिनींना देखील थँकू म्हणतो कारण ते रथाचे एक  चाक  आहे.

खूप मोठा हो,…….. देव तुला सर्व यश, सिद्धी देवोत. ……पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा ....

--- सचिन गाडेकर

Comments