वाह रे लोकशाही वाह !!!! ११/३/१६

वाह रे लोकशाही वाह  !!!! ११/३/१६

देश विरोधी गरळ ओकणारा हिरो होतो कोणी अर्धवट कुमार |
हिमनगासही लाजवणारा वीर हनुमनथाप्पा मात्र स्मृतीपसार |

मद्यसम्राट बुडवतो कर्जे मस्त देश परदेश त्याचा विहंग विहार |
दोन पाच हजारांपायी लुटतात बळीराजास बँका संस्था सावकार |

झालाय बुद्धीवन्तांना असहिष्णुतेचा अन मुखवट्याचा आजार |
देशफोडी, बरबादी , तुकडे ची भाषा अन चिडीचूप सार आरमार |

अजून किती हवी मोकळीक यांना किती द्यावं चर्चेचं  महाद्वार |
जिथे लोकशाहीचे मंदिरच ठरतेय आजकाल सर्वाधिक कामचुकार |

नुसता नसावा विरोध, व्हावा जवानांचा,देशाचा विचार सारासार |
ठरवा अन सांगा काय उपाय शेवटी विचार , बंदूक वा तलवार |

--- सचिन गाडेकर 





Comments