भारतीयच मी .....
भारतीयच मी ...प्रत्येक बदलास असा अनुकूल मी ... 17/4/16
वहीवाट सोडूनी मोकळी, मार्ग धोपट का आणिला पुढती |
डावलुनी निकष का मिळावी अपात्रास अनपेक्षित बढती |
ना आवाज, ना घोषणा,ना उपवास, ना आंदोलनाचे बिगुल मी |
भारतीयच मी ...प्रत्येक बाबीस नेहमीच असा अनुकूल मी ....
जाहली उदंड मद्य गाथा, लातुरात म्हणे रेल्वेने पाणीमात्रा |
थेट धरण उकरतो धनाढ्य अन संपवतो गरीबच जीवनयात्रा |
ना खेद, ना रोष, ना प्रतिक्रिया, ना कारवाई, ना प्रतिकूल मी |
भारतीयच मी ...प्रत्येक बाबीस नेहमीच असा अनुकूल मी ....
पुतळे, स्मारके, नामांतरे होताय आता म्हणे एका पेक्षा एक |
भावनिक, प्रांतीय मुद्दे उराशी, ना कुणालाही विकासाची मेख |
ना बदल, ना दखल, ना संघटन, दर वेळी तीच तीच भूल |
भारतीयच मी ...प्रत्येक बाबीस नेहमीच असा अनुकूल मी ....
बोले कोणी देशविरोधी अन माता की जय म्हणण्याची ही लाज |
बकवास चर्चा, आरडा ओरड, प्राईम टाईमचे भुरटे मिडीयाराज |
ना निषेध, ना प्रश्न, ना जाब कुणा, निर्धास्त बिलकुल मी |
भारतीयच मी ...प्रत्येक बाबीस नेहमीच असा अनुकूल मी ....
करा तुकडे करा म्हणे कापून केक काही येथे दिवाळखोर |
उपाय काय, योजना काय, दिशा काय, का विभाजनी जोर |
ना मंथन, ना चिंतन, ना सिंहावलोकन, ना कशास सानुकूल मी |
भारतीयच मी ...प्रत्येक बाबीस नेहमीच असा अनुकूल मी ....
क्रमश:.......
---सचिन गाडेकर
Comments
Post a Comment