आज संक्रांत आहे.

आज संक्रांत आहे.

सगळीकडे पतंग उडवणे चालू आहे. काही पतंग एकटेच झाडावर लटकलेले दिसतात ही. काही पतंग मस्त मौजेत उडत होते ते सुद्धा रंगबिरंगी रुपात. जो तो वेगळा परी एकाच नभात सामावून गेला होता.

हे उडणारे पतंग पाहून एकच डोक्यात आले की जो पतंग आसरी पासून खूप दूर जातो तो कटण्याचा जास्त धोका असतो. दृष्टीआड झाला की सृष्टीआड झालाच समजा. हा न्याय तर खूप जवळून अनुभवलाय सरत्या काळात. एकत्र उडणारी , विहरणारी आणि घरटे उभी करणारी पाखरे अलगद दूर होतात. भावा भावात वितुष्ट होते या जगात तर मग मित्र, सवंगडी आणि नातेवाईक कसे अपवाद असतील?जे आले तर जातीलही परंतु प्रयत्न व्हावा एकसंघ राहण्याचा.  हे सणवार हा लेखा जोखा करावा यासाठी तर नसतील ना...

या वास्तव बाबी पाहत मनापासून वाटते की आपण सारेच असे एका घट्ट आसरीशी जोडले राहू. आसरी अन धागा कसा ही असो तो धरून राहणे गरजेचे. आपले एकत्र येणे ,भेटणे, एकत्र काम करणे सगळे विधात्याने गुंफलेले धागे असतात हे मान्यच करावे लागेल. आता, ते धागे आमच्या कटू वाणी, अहं आणि स्वार्थरूप कैची ने कटू नयेत.

देव करो की कसला दुरावा येऊ नये अन कधीही आपले नाते कटून इतरत्र भरकटू नये. नाते त्या मस्त मौजी पतंगसमान मुक्त संचार करावे. मस्त मुक्त विहरत त्या मुक्त गगणास गवसणी घालावी असे दृढ व्हावे.

तसे खूप सारे मेसेज आलेत अन दिलेत पण. तिळगूळ घ्या अन गोडगोड बोला.  हा तिळातला गोडवा अन गुळातला स्नेह आपल्या नात्यात असाच टिकून राहो.

पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।

                                 -- सचिन गाडेकर

Comments