चर्चासत्र आणि डोस बुद्धीला ।

चर्चासत्र आणि डोस बुद्धीला ।

गेल्या आठवड्यात एक मस्त बौध्दिक चर्चा ऐकावयास मिळाली. इथे जवळच सात्रळ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात एक राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित केले होते. माझे सिनियर आणि मित्र श्री. श्रीकांत सुसर सर तेथे प्राध्यापक आणि इंग्रजी विभागप्रमुख देखील आहेत. त्यांनी या चर्चासत्रास येण्याचे फर्मानच सोडले होते. त्यात त्यांनी प्रमुख वक्ते म्हणून आमचे प्राध्यापक श्री. रोहित कावळे सर आणि श्री. आनंद कुलकर्णी सर येणार असे कळवले.

पुण्यात एम.ए. शिकत असताना काही अवलिया लोकांच्या छत्रछायेखाली शिकायला मिळाले. जे २००८ ते २०१० च्या असणारे आय.ए.एस.इ.चे सर्व विद्यार्थी माझ्याशी पूर्णपणे सहमत होतील. यात क्रिटीसिझम हा अतिशय किचकट वाटणारा विषय श्री. रोहित कावळे सर आणि श्री. आनंद कुलकर्णी सर शिकवत. त्यात श्री. रोहित कावळे सर थेट संगमनेरहून आणि श्री. आनंद कुलकर्णी सर थेट नारायणगावहून आठवड्यातून दोनदा येत असत. रविवार असो  वा शनिवार आम्ही कधीही मागे हटलो नाही. समोर अशी बाप माणसे असतांना कोण बंक मारणार? तसे खरं सांगायचं झालं तर शिकवलेले सगळे कळत नसेलही पण ऐकत बसावं असे चित्र असे.
त्यात रोलंड बार्थेस, देरीदा (या माणसला आम्ही दरिंदा म्हणायचो कारण थेअरी समजतच नसे.)आणि अनेक क्रिटिक आमच्या लेवलला येऊन शिकवलं सरांनी. आता हा सलग वग गाण्याचे कारण तितकेच महत्त्वाचे. कारण परवा सरांना ऐकले आणि पुन्हा मन त्या जुन्या दिवसाकडे वळले. एक दिवस , एक रजा, नोंदणी फी आणि वेळ सगळ कसं सार्थकी लागलं. आता सांगतो विस्तृत.

परवा चर्चासत्र होते pedagogy of langauge and literature या विषयावर. कुलकर्णी सरांनी सर्वप्रथम तोफ डागली ती विषय आणि अर्थ यावर. What is pedagogy? It is a set of formula, rules, restrictions, standard, norms and way of teaching. I do not believe in certain fixed pedagogy because Education is a liberating force. It exists before we exit.  Pedagogy must help us to see through.  हे असे प्रास्ताविक करत समोर बसलेले सारे श्रोते विचारमग्न करून टाकले. I do not believe in pedagogy. I have serious objections because I believe in modules.  Modules are specific and clear.  विषय आणि त्याची खोली किती असणर आहे एव्हाना आम्हाला कळू लागलं होतं.

पुढे सर म्हणाले की मला या पुढे बसलेल्या तरुण शिक्षकांना सांगायचं आहे आणि त्यांच्याशी बोलायचं आहे. Teaching is not an art.  It is not a technique of tools. It is not transferring skills. classroom teaching is a sight where interactions must take place. Your teaching should start with equipping students with questions.  वाह ! काय माहौल झाला होता. सर थेट प्रश्नावर शरसंधान करत होते. जो तो  आत्मपरीक्षण प्रक्रियेत गुंतत जात होता. वर्ग म्हणजे पाट्या टाकणे आणि लंबे चौडे लेक्चर देणे वगैरे नाही हे सर्वश्रुतच आहे पण विद्यार्थी जिज्ञासू होताय का? ते प्रश्न विचारत आहे का?

पुढे, teaching is not at all a pleasant idea. Let us do away with this thought that teaching is a pleasant process. It should not be. All beautiful things are problematic. Let us be provocative. Let us stop being fool and cool.  Raise a question. Literature is meant to raise a question. It is an oasis. It reflects life.
एवढ्यावर सर न थांबता पुढे म्हणाले की Teaching is to create problems and not find solutions. It is to create rebellious minds. It is for making students negotiate.  You have to charge for things.  Let us start being experimental. We are here not to interpret but to experiment. (याचा मतितार्थ त्यांनाच कळू शकतो हे लिटररी क्रिटीसिझमशी परिचित आहेत.) सरांनी मध्ये एक व्याख्या केली आणि मनात ठसली देखील.
“ What is Teaching? Seeing change in students is teaching..”
“What is Teaching? Realizing change in teacher is teaching.”

एवढे सांगत सांगत सर किती समरस झाले होते विषयात. जोश, आवेश, तीव्रता तीच २०१० ची. धार फक्त अजून तेज झालेली आहे हे नक्की. मधेच नेहमीप्रमाणे काही कविता आणि त्यावर आक्रमण आणि तीव्र आक्षेप.

शेवटी परत समारोप करता करता पुन्हा काही वाग्बाण निघाले ते असे. Learn to problematize the text. Raise questions. Equip inquisitiveness. Alert your students with variety of possibilities. We are beings in making; that’s teaching. Be a host of questions. Teaching is to make you “THINK.”

हा सगळा भाग ऐकून झाला आणि मनोमन धन्यवाद दिले श्रीकांत सर यांना. असा अभूतपूर्व योग लाभला तो या चर्चासत्रा मुळेच.
सरांनी पुन्हा एकदा जिंकलं. असे सेशन पुन्हा पुन्हा मिळोत हीच अपेक्षा.  पुन्हा एकदा धन्यवाद सर, धन्यवाद श्रीकांतजी. 

                                                      --- सचिन गाडेकर

Comments