Deep Work

Deep Work (भाग एक ) ३१/१/१८

गेल्या पंधरवड्यात एक अप्रतिम , खास पुस्तक चर्वण करायला मिळालं. Carl Newport चे Deep Work हे पुस्तक Ajinkya Kulkarni यांनी दिले आणि हे पुस्तक आतापर्यंत वाचलेल्या पुस्तकांत Top 10 मध्ये जाऊन बसलंय. दोन सलग पारायण झाली आणि ठाव घेतलाय या पुस्तकानं. व्यावसायिक किनार असूनही खूप प्रभावित करतं हे पुस्तक. रोजच्या रोज येणारी व्यवधाने आणि अवरोध व्यवस्थित सांभाळत कामाला वेग देणे अथवा यश प्राप्त करणे हे मुख्य ध्येय. माणसाला वेळेची आणि नियंत्रित कार्यरचणेचो शिकवण देते हे पुस्तक. हे पुस्तक वाचून आणि त्यातील सूत्रे जर आत्मसात झाली तर बदल निश्चित दिसतो.

एखादे काम हाती घेतले किंवा एखादे काम करत असताना शारीरिक, मानसिक आणि व्यावहारिक व्यवधाने येतात आणि ते कामाचा फोकस आणि गती मंदावतात हे नक्की. आज कोणीही एका कामात तास न तास रमलेला दिसतच नाही. एका सोबत अनेक काम होतात आणि काहीच पूर्ण होत नाही. multi tasking असणे वेगळे आणि कामात अडथळे येऊन काम न होणे वेगळे. हे व्यवधान शारीरक ही असू शकते. आजच्या इंटरनेटच्या जमान्यात तर विचारायलाच नको. या सगळ्या गोष्टींना सूत्र देत उपाय सुचते हे पुस्तक.

आता सुरुवातीलाच केलेली व्याख्या वाचूनच पुढचा ओघ लक्षात येतो.
Deep work – professional activities performed in a state of distraction – free concentration that push your cognitive capacities to their limits. These efforts create new value, improve your skills and are hard to replicate.
या प्रक्रियेतून अवरोध विरहीत होणारी एकाग्रता संज्ञानात्मक क्षमता मर्यादा ओलांडून काम करू लागते आणि माणसातील कौशल्य विकसित करतात. या अश्या सिद्धांतांना पाठबळ दिलंय यशस्वी उद्योग जगतातील उदाहरणे देऊन. यातील सर्वात पहिले बिल गेट्स हे स्वत: हा माणूस Think weeks ही संकल्पना राबवत. यात वर्षातून दोनदा स्वत:ला या सर्व भौतिक आणि सामाजिक विश्वातून अलगथलग ठेवून, कोणाशीही संपर्क न साधत फक्त एकटे विचारमंथन करत. स्वत: जे के रोव्लिंग (Harry Potter लेखिका )स्वत: लिखाण दरम्यान पूर्ण अलिप्त असत.

Teach your mind to go deep. मनाला प्रशिक्षित करा.
Teach yourself how to take advantage of training your brain and transforming your work habits to place deep work at the core of your professional life.
The process of mastering hard things never ends.
जे लोक कामादरम्यान एकाग्र होऊ शकत नाही ते चांगले काम देखील करू शकत नाहीत. People experiencing attention residue after switching tasks are likely to demonstrate poor performance on the next tasks. It does not allow person to maximize performance on the current task.

Deep Work म्हणजे जे तंत्र आपले काम अनुकूलतेकडे नेते ते. याला सपोर्ट करते अजून एक विधान आणि ते म्हणजे, मानवी मेंदू व्यवधान आणि अवरोधाला लवकर respond करतो.

असो, अजून बरेच काही आहे. पुढच्या भागात प्रयत्न करू लिहिण्याचा. मिळाले तर नक्की वाचावे आणि बदल घडणार हे नक्की.

- सचिन गाडेकर

Comments