Deep Work (भाग दोन) ३/२/१८

Deep Work (भाग दोन) ३/२/१८

या पुस्तकाचा पूर्वार्ध जरी वाचून  झाला असेल तरी मला मात्र उत्तरार्ध जास्त भावलाय. पुस्तकाच्या या भागात काही नियम (Rules) सांगितले आहेत आणि हे नियम खूप जास्त प्रभाव पडतात मनोपटलावर.

पहिला नियम म्हणजे Work Deeply. यात Chain method देखील प्रभावी आहे. त्यात Rhythmic philosophy येते. लेखक समजावतो की डीप वर्क मुळे आपल्या सवयी नियमित होतात. यात कामात असा rhythm येतो की काम आपोआप सुकर होते. लेखक इथे जे. के. रोव्लिंगचे उदाहरण देत स्पष्ट करतात की ‘Putting efforts towards supporting deep work task, you increase the perceived importance of the task.’ यात मानवी मन नकळत प्रेरित होते आणि जास्त कार्यान्वित होते.

पुढे एक अजून एक नवीन सूत्र वाचण्यात येते ते म्हणजे Embrace boredom. जीवनात काही कसे कंटाळवाणे बनेल? जे काही येईल वा भासेल त्याला मिठी मारा. त्याला कर्माच्या मगरमिठीत घ्या आणि संपवून टाका त्याचे अस्तीत्व. त्यात तोच तोच पणा नाविन्याने टाळावा लागेल. आपण जर मनाला हे प्रशिक्षण दिले नाही तर मन व्यवधानाकडे खेचले जाईल.

पुढे एक अजून विशेष सूत्र येते आणि ते असे. ‘Don’t take breaks from distraction. Instead Take breaks from focus.’ हे सूत्र हेच सांगते की आपण व्यवधान केंद्रित काम करतो आणि त्यातून ब्रेक घेत मुख्य कामाकडे वळतो. म्हणजे मी एखादे आर्टिकल लिहित आहे आणि त्यात ४० वेळा फोन अथवा उठबस करतो. यात आर्टिकल मुख्य भाग न राहाता उठबस किंवा फोनच मुख्य धारा बनतो आणि असे दिसते की आपण ब्रेक घेतो कारण फोन आणि उठबस हा फोकस बनतो.

या पुढे सोशल मिडिया या दुष्टचक्राला खूप सांभाळत आणि समजावत स्पष्ट केले आहे. या पुस्तकात कुठेही एका टोकाचा विचार दिसत नाही हे विशेष. कारण आपल्याकडे फक्त extreme विचार होतो असे नेहमी दिसते. यात कामाच्या वेळेत आणि कौटुंबिक वेळेत हे कसे हाताळावे हे मस्त समजावले आहे. लेखक समजावतो की ‘We must find a day within a day.’   आज आपणास मिळालेल्या २४ तासांपैकी अर्धे तर झोपेतच जात असावे. बाकी दैनंदिन कामकाज आणि वेळ यांचा ताळा बसतो का हे पहायला हवे. आज काल अनेक शाळा , कॉलेजमध्ये  विद्यार्थी आणि शिक्षक यांना मोबाईल जमा करावा लागतो कारण हेच असावे. परंतु याचा वचपा निघतो संध्याकाळी. घरात सर्व बसले असतांना किंवा इतरांना वेळ देतांना हे मात्र पराकोटीला गेलेले दिसते. लेखक म्हणतो की नकळत हे डिजिटल यंत्रे तुमच्या रिकाम्या वेळेला खाऊन टाकतात. ज्या वेळेत थोडा आराम, मानसिक आणि शारीरिक ब्रेक हवाय, काही एकटे स्वत:शी क्षण घालवायचे असेल तिथे आक्रमण होते. हे थांबवायला हवे.  यात नियमन यायला हवे.

पुढे तर लेखक एक पाऊल पुढे टाकतो आणि सांगतो की ‘Drain the Shallow.’ स्वत:ला कामाच्या तासात गाडून घ्या. जास्त वेळ दिला म्हणजे काम ठीक होईल हे मान्य नाहीच. उथळपणा नाहीसाच करा. जर वेळ माफक असेल तर तिची किमंत राहते आणि काम करणारा त्या वेळेची प्रामाणिक राहतो. दिरंगाई किंवा चालढकल वृत्ती उभी राहिली तर कुठलेही काम वेळेत तडीस जाणार  नाही. 
‘Once everyone has less time to get their stuff done, they respect that time even more.  People become stingy with their time and that’s a good thing. They don’t waste it on things that just don’t matter. When you have fewer hours you spend them wise. ’

असो, अजून बरेच काही आहे. शेवटच्या भागात प्रयत्न करू लिहिण्याचा. मिळाले तर नक्की वाचावे आणि बदल घडणार हे नक्की.

- सचिन गाडेकर

Comments