झेप ३०/८/१८
झेप ३०/८/१८
कधी उजाडले अरुणोदयी, कधी गडप अंधार झाला ।
घेत रजा चांदण्याची हळुवार कधी चंद्र पसार झाला ।
कळले न मला ।
कधी आरवला कोंबडा कधी गलबला जागृतीचा झाला ।
मोडली साखरझोप एकदाची कधी जीव गतिमान झाला ।
कळले न मला ।
घाव,व्रण, यातना वेदना आता हा पाठ पुरता जुना झाला ।
पेपर वा परीक्षा माझा देवची घेतो पुन्हा साक्षात्कार झाला ।
कळले न मला।
काळजी, विवंचना, चिंता सुटल्या सुरू नवा मार्गक्रम झाला ।
योजना, रचना, वाचन, अभ्यास रोजनिशी हा कर्मभाग झाला ।
कळले न मला।
सावरले, आवरले, शुद्ध, साफ अगदी अंतर्भूत देही मनी झाला ।
लक्तरे, पद, पैसा, प्रतिष्ठा,नाम सगळे तोकडा कार्यभाग झाला ।
कळले न मला ।
जोडले कर प्रभु समीप बैसोनि, भूत अल्पसा चित्तयाग झाला ।
घे झेप अजूनही आभाळ रिते म्हणे तो, उडणे पुन्हा निश्चय झाला ।
कळले न मला।
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment