कॉर्पोरेटकल्लोळ प्रकाशन सोहळा आणि पर्वणी ११/८/१८

‘कॉर्पोरेटकल्लोळ प्रकाशन सोहळा आणि पर्वणी ११/८/१८

प्रथितयश लेखिका निलांबरी जोशी यांच्या ‘कॉर्पोरेटकल्लोळ' या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यास जाण्याचा योग आला. हे केवळ एक पुस्तक प्रकाशन न राहाता एक पर्वणी बनले हे माझे मन कार्यक्रम झाल्यावर मला सांगत होते.

स्वत: लेखिका निलांबरी जोशी यांना ऐकणे म्हणजे काही तास बसून पुस्तक वाचणेच. त्यात येणारी मानसशास्त्र आणि त्यांची निरीक्षण क्षमता यामुळे खूप काही शिकायला मिळते. त्यांचे पुस्तक अगोदरच मिळाले होते आणि प्रकाशनाच्या सोहळ्यास जाण्यापूर्वी ते वाचून झाले पाहिजे असा चंगच बांधला होता आणि असे अप्रतिम पुस्तक वाचून पूर्ण करून तिथे हजर झालो.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मनोविकास प्रकाशनातर्फे एक निवेदन झाले. तदनंतर स्वत: लेखिका यांनी प्रास्ताविक करत या पुस्तकाचा संपूर्ण प्रवास अलगद उलगडला. त्यांनी पुस्तकात जे जे संदर्भ दिले ते डोळ्यासमोर तरळत होते. मला वैयक्तिक या पुस्तकाच्या प्रवासात लेखिकेचा किती सखोल अभ्यास आहे हे पदोपदी आणि पानोपानी जाणवले. अनेक संकल्पना समजावण्यासाठी त्यांनी वाचलेल्या पुस्तकांचे संदर्भ, दाखले इतके आहेत की एक मोठी यादी बनते की हे अजून वाचायचे आहे. त्यात त्यांचे विषयास धरून अचूकपणे दिलेले चित्रपटांचे संदर्भ तर चकितच करतात. मी स्वत: आउटसोर्स हा चित्रपट खूप पूर्वी पाहिला होता पण त्याचे असे मस्त विवेचन वाचून तो चित्रपट आज समजला असे म्हणेन.

पुढे कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे यांच्या मुळे कार्यक्रम दुग्धशर्करायोग झाला आणि पर्वणी बनला. पुस्तकाचे प्रकाशन विवेक सावंत, डायरेक्टर, एम.के.सी.एल., डॉ राजेंद्र बर्वे, सुप्रसिध्द मानसोपचारतज्ञ आणि दिपक घैसास, चेयरमन आय-फ्लेक्स सोलूशन्स ली. यांच्या हस्ते झाले. औपचारिक प्रकाशन झाले आणि स्वत: लेखिका या तिन्ही मातब्बर मंडळीना प्रश्न विचारत परिसंवाद घडवून आणणार होत्या. एरवी वृतपत्रात वाचतो किंवा टीव्हीवर ऐकतो अशी चारही ग्रेट मंडळी परीसावादातून ‘कॉर्पोरेटकल्लोळ’ या पुस्तकाच्या निमित्ताने अजून काही देणार होते.

डॉ राजेंद्र बर्वे सर यांनी मानसोपचार पद्धती आणि त्यातील mindfulness वर खूप छान विवेचन केले. त्यांनी दिलेले गौतम बुध्द आणि त्यांचे विचार यावर केलेले विवेचन वाचन करण्यास प्रवृत्त करेल हे नक्की.

दिपक घैसास सर यांनी आय.टी. च्या संदर्भात खूप छान मत विशद केले. त्यांचा प्रवास आणी कर्मचारी यांच्याशी असणारी पध्दती खूप परिणामकारक होती. त्यात एका चूक झालेल्या व्यक्तीला न ओरडता फक्त समजून घेतले तर ती व्यक्ती स्वत: डोळ्यात पाणी आणून सांगत होती की मला रागवा तुम्ही कारण मी चूक केली आहे.

दिपक सावंत सर यांच्याशी झालेला परिसंवाद

दिपक सावंत यांना युट्यूबवर ऐकले होते म्हणून प्रत्यक्षात ऐकताना अजून आनंद येत होता. स्वत: ते सुपरक्म्युटर टीमचा भाग होते आणि अनेक मोठ्या पदांवर काम करून देखील एवढा साधेपणा आणि सरळ सुलभ पध्दत विशेषच. पहिल्या प्रश्नात सी-डेक मध्ये महिला आणि पुरुष कर्मचारी शाळेला सुट्टी असेल तर आपल्या मुलांना घेऊन ऑफिसला येतात आणि शनिवारी फक्त महिला कर्मचारी यांना शनिवारी सुट्टी असते तर हे कसे जमवले असे विचारले. या उत्तरात ते म्हणाले की लोकांच्या मागे लागून आणि सतत फॉलोअप करून काम नाही करून घेता येत. कळीच्या पाकळ्या जर एक एक करून ओढल्या तर ती कशी उमलेल? सूर्य उगवला की कळी आपोआप उमलते आणि सौदर्य दिसते. तुम्हाला ऑफिसमध्ये एक अफलातून इको-सिस्टम उभी करावी लागते.

पुढे ते म्हणाले की एम.के.सी.एल ला ही आता उन्हाळच्या सुट्टीत सर्वांची मुले येतात. पालक त्यांना भेटू शकत. मुलं धमाल करतात, स्वयंपूर्ण होतात, स्वत:ला सावरतात, नाटके ई. सादर करतात. यामागे how to humanise the work environment? हा मूळ विचार होता. जर काही काम करून घ्यायचे असेल तर ते लोकांच्या स्वयंप्रतिभेने, सर्जनशीलतेतून होणार आहे म्हणून  ते वातावरण प्रफुल्लीत असायला हवे. कोणीतरी माझ्या मागे लागला आहे असा लवलेश नकोच. हो आपल्या बरोबर काम करणारा वर्कफोर्स आहे त्याकडे कसे पाहिले पाहिजे हे जास्त महत्त्वाचे आहे.
हळूहळू आपण इथपर्यंत येऊन पोह्चायला हवे की हा केवळ काम करणारा वर्कफोर्स हा human capital किंवा  human resource तर अजिबातच नाही. काम करणारे उपभोग्य आणि काम देणारे उपभोक्ते असे बिलकुल नाही. ते पुढे असे देखील म्हणाले की जेंव्हा पासून natural resources हा शब्द पुढे आला तेंव्हा पासून जास्त उपभोगणे सुरु झाले. त्यांनी हे देखील सांगितले की वर्कफोर्सला काम हे आपले वाटले पाहिजे आणि त्यासाठी खूप काही करावे लागेल. त्यांनी हे देखील सांगितले की लेखिकेने हे सगळे खूप छान प्रकारे पुस्तकात मांडले आहे.

दुसऱ्या प्रश्नात निलांबरी जोशी यांनी ‘आजच्या तरुणांना नोकरी मिळवण्याचा एक ताण असतो त्याचे व्यवस्थापन कसे करावे? आणि एम्प्लोयबीलीटी वाढावी यासाठी काय करावे?’ उत्तरादाखल सावंत सर म्हणाले की आजचे विद्यार्थी १०० तून एक निवडला जातो कारण क्वालिटी नसते. याचे कारण तो विद्यार्थी इंजिनियर नसून फक्त डिग्री घेतलेला किंवा पास झालेला असतो. प्रत्यक्ष ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया आणि ते ज्ञानउपयुक्ततेची प्रक्रिया यात गफलत झालेली आहे. ते म्हणाले की पुस्तकातून किंवा लेक्चरमधून नाही तर कामातून सुरुवात करायला हवी. कामातून ज्ञान प्राप्ती हवी. (लर्निग बाय डूइंग) learning by doing असा कान्टचा सिद्धांत होता. स्वत:च्या काही प्रयोगांतून त्यांनी Action followed by reflection, Reflection followed by conclusion, conclusion followed by pragmatic planning and pragmatic planning by again new level of profound of learning  अश्या पद्धतीची मांडणी केली.

पुढे त्यांनी असेही नमूद केले की आपल्या आजच्या पद्धतीमुळे predictable work शिल्लकच राहणार नाही. आजच्या शिक्षण पद्धतीमुळे सर्जनशीलता शिल्लकच राहणार नाही. unpredictable work कडे जाण्याची तयारी हवी. एकदा शिकत शिकत जायचं आणि एकदम एका दिवशी सांगायचं की आता काम कर हे विनोबांचे विचार साधारभूत प्रकट केले. शिक्षण पद्धतीमधे मुलभूत बदल केले पाहिजे की कामातूनच ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. जेंव्हा जीवनात अनुभव येतात आणि मग ते अनुभव लिहायचे. त्यांनी खंत व्यक्त केली की आजचे सबंध शिक्षण predictable work चीच गोळी देते. अगदी २१ अपेक्षित वाचून अपेक्षित प्रश्न आणि त्यावर २१ अपेक्षित गुण असे समीकरण उभे राहते आणि एकदा कामाला सुरुवात केली की २१ अनपेक्षित प्रश्न उभे राहतात. तेंव्हा  हे सोडवण्याची तयारी हवी. त्यासाठी open –ended questions हवेत. त्यांनी खूप छान उदाहरण दिले की एका तारेवर दोन पक्षी बसले आहेत मग प्रश्न असे नसावेतच की पक्षी कुठे बसले आहेत किंवा किती पक्षी बसले आहेत. IQ हा जन्मजात मिळतो पण EQ वाढवत न्यायचा आहे. तो वाढू शकतो.

ते असेही म्हणाले hard skills चे प्रमाण कमी होत चालले आहे आणि  life skills चे महत्त्व वाढत चालले आहे. त्यात Communcation skils, soft skills यासाठी amzon वर ४५००० पुस्तके आहेत. आज employability साठी   digital skills, language skills, soft skills, peoples skills  and communication skills पाहिजे. दुर्दैवाने आजच्या काळात हे विषय दिसत नाहीत. आपल्याला नुसत smarter होऊन चालणार नाही तर wiser होण्याची गरज आहे. देशाला smart city पेक्षा wise city हवी. अशी वेगळी आणि परिणामकारक शिक्षण व्यवस्था उभी करावी लागेल. आज वर्क बेस लर्निंग शिक्षण हवे असे गांधीजी सांगतात. त्यात learning हा शब्द L+EARNING  असल्यामुळे earning  हे earning confidence, knowledge, money, self-esteem, self realization, self actualization.  Learning is never complete unless this kind of earning takes place.  हि गुरुकिल्ली आहे असे नमूद ही केले.

अश्या पर्वणीला साक्षीदार होता आले म्हणून निलांबरी जोशी यांचे पुन्हा एकदा आभार. लेखिका निलांबरी जोशी यांनी अजून प्रश्न विचारावेत आणि पाहुण्यांनी अजून बोलावे असे वाटत होते. हा सुवर्णयोग विशेष होता. पुस्तक वाचून झाले आहे आणि आता प्रतीक्षा पुढच्या पुस्तकाची. पुन्हा एकदा धन्यवाद.

--- सचिन गाडेकर

Comments