ग्रेट भेट : श्री. किशोर कदम म्हणजेच सौमित्र
ग्रेट भेट : श्री. किशोर कदम म्हणजेच सौमित्र
आज मराठी रंगभूमीचे हरहुन्नरी कलाकार आणि कवी श्री. किशोर कदम म्हणजेच सौमित्र (जोगवा, फॅण्ड्री, special 26 अश्या अनेक चित्रपटात खास भूमिका वठवणारे)यांनी येणाऱ्या एका मराठी चित्रपटासाठी स्कुल मध्ये एका दिवसाचे शूट पूर्ण केले. सदर चित्रपटात सौ. अलका कुबल देखील आहेत. आज भेटण्याचा सहजच योग आला.
आज दिवसभर हि मंडळी शाळेत होती. Lights... Camera आणि Action …चा प्रत्यय मुलांना आला. शाळेचे ऑफिस आणि परिसर खूप भावल्याने चित्रपटातील एक महत्त्वाचा भाग आज शाळेत शूट करण्यात आला. सकाळपासून झालेली लगबग मुळे मुलांना देखील सिनेमा कसा शूट होतो हे प्रत्यक्ष पाहता आले आणि एका दिग्गज कलाकाराला भेटता आले.
दिवसभराच्या शूट नंतर स्वत: किशोर कदम (सौमित्र) यांनी आमच्या शाळेतील चिमुकल्या मुलांसाठी थोडा वेळ दिला. व्यवस्थापनतर्फे त्यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यांचे स्वागत करण्यात आले.
मुलांना संबोधित करतांना या अवलिया माणसाची उंची लक्षात येते. सदर संबोधनात ते म्हणाले फक्त अभ्यास करायचा नाही. खेळ पण तेवढाच महत्त्वाचा आहे. प्रत्येक जण अभ्यास करून काहीतरी होऊ शकेल. कुणी शास्त्रज्ञ, खेळाडू, शेफ बनतील. अभ्यासासोबत extra- curricular activity कडे देखील लक्ष द्या. एखाद्या विषयात कमी मार्क्स मिळाले तर वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही. मार्क्स मिळवणे फारसे कठीण नाही. प्रत्येकात पहिला येण्याची क्षमता असते. कुठला तरी एक गुण स्वत:त आहे तो शोधा. तो फुलवा. लहानपणापासून खेळाचा आनंद घ्या.
शेवटी मुलांच्या आग्रहास्तव त्यांनी स्वत:च्या अजरामर आणि लोकप्रिय गारवा या गीतसंग्रह मालिकेतला एक भाग ऐकवला आणि सर्वांचे मन तृप्त जिंकले. विद्यार्थी या पडद्यावरील अभिनेत्याला प्रत्यक्ष भेटून भारावून गेले.
Comments
Post a Comment