नसतील भले ११/१२/१९
नसतील भले ११/१२/१९
नसतील जरी जळत्या मशाली, दिवे, पणत्या भले ।
पण अंतरात धगधगती ज्वलंत आग असली पाहिजे ।
नसतील जरी मिष्टान्न, कांदा, भाकर, बर्गर भले|
पण पोटात सदाच शिल्लक भूक असाया पाहिजे |
नसतील राजवस्त्र अंगरखे, उपवस्त्रे, लंगोट भले ।
पण झाकाया देह पुरता एवढी लाज असाया पाहीजे ।
नसतील मित्र,सवंगडी, दोस्त, यार, मित्र भले ।
पण अंतसमयी उचलाया पुरते चार असाया पाहिजे ।
नसतील रकमा, रोकड, ठेवी बँकेत भले ।
पण विकला जाणार नाही ऐशी किंमत असाया पाहिजे ।
नसतील भोगवस्तू, आरामबाता, स्वर्गसुख भले ।
पण लागेल डोळा क्षणात समाधान असाया पाहिजे ।
नसतील दर्द, दुःख, यातना, त्रास मग भले ।
पण आठवावे जिवलग ऐसी एखादी वेदना असाया पाहिजे ।
नसतील अपेक्षा, आकांक्षा, स्वप्ने, इच्छा भले ।
पण जगावे आयुष्य अवघे एक कारण असाया पाहिजे ।
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment