विचार ...विचार..
विचार ...विचार... १६/८/१५
उजाडतो दिन अन मावळतो परी |
तसा तुझा लळा अन प्रेम जीवापरी |
तेवत ठेवते आस पणतीची वात |
करत खोलवर व्रण आतून मनात |
भास तुझा सदा अखंडित पदोपदी |
गेले मास वर्ष जणू बदलली सदी |
गुजरतो दिन ना काही ऐकते रात |
रोजचाच काळ तिष्ठत घालूनिया घात |
कसे ऐकू तुझे बोल अन शब्दांचे सूर |
कसा होऊ कठोर कसा निर्जीव निष्ठूर |
शांत निश्चिंत तो मग्न फक्त विचारात |
मुकी बापडी नजर फिरे शोधत अंधारात |
साद देतो मनोमनी करे हा यत्न मनोभार |
का करशील खोटा खोटा एकदा स्वीकार |
भले नको नजरभेट, देत जा पुसट खबरबात |
श्वास तुझ्या नावाचा आहे सोबत जन्मसात |
--- सचिन गाडेकर
उजाडतो दिन अन मावळतो परी |
तसा तुझा लळा अन प्रेम जीवापरी |
तेवत ठेवते आस पणतीची वात |
करत खोलवर व्रण आतून मनात |
भास तुझा सदा अखंडित पदोपदी |
गेले मास वर्ष जणू बदलली सदी |
गुजरतो दिन ना काही ऐकते रात |
रोजचाच काळ तिष्ठत घालूनिया घात |
कसे ऐकू तुझे बोल अन शब्दांचे सूर |
कसा होऊ कठोर कसा निर्जीव निष्ठूर |
शांत निश्चिंत तो मग्न फक्त विचारात |
मुकी बापडी नजर फिरे शोधत अंधारात |
साद देतो मनोमनी करे हा यत्न मनोभार |
का करशील खोटा खोटा एकदा स्वीकार |
भले नको नजरभेट, देत जा पुसट खबरबात |
श्वास तुझ्या नावाचा आहे सोबत जन्मसात |
--- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment