माझ्या भाऊराया

माझ्या  भाऊराया ....... रक्षाबंधन 29/8/15

स्वीकारेन मी बंधन रक्षणाचे तुझे नेहमी सदाच भाऊराया |
दे प्रत्येकीस सन्मान तू ही अन अशीच पवित्र निर्मळ माया |

बेफिकीर मी जगती या कारण तू आहेस सदैव मज रक्षाया |
पुढे होऊनी धजावास तू रक्षणास शेकडो पिडीत त्या निर्भया |

नको महागडी भेट कसली नकोस मजला भलते सोपस्कार |
नको नजरेत कामुक वासना, असू दे प्रेम आदर अन सत्कार |

भले भेट होऊ दे मासी अंतरी वा होऊ दे अगदीच वर्षाकाठी |
परी रहा उभा जी कुणी एकटी भक्कम असा तिच्याही पाठी |

घे व्रत तू सन्मानाचे मनी,  घे वचन सर्व समावेशाचे |
नारी पूज्य तेथे देव अविभाज्य हे सूत्र आहे या देशाचे |

                                        -- सचिन गाडेकर

Comments