उभा राहीन मी...
उभा राहीन मी... 03/09/2015
आहेस चूक अन महाभाग असले प्रहार होतील ही |
नाही जमणार सोड तू हे सल्ला खवचट देतील ही |
होऊ दे आवाज ... वाजू दे पखवाज
ऐकण्या साद तुझी उभा राहीन मी...
नको प्रयोग तुझे भलते नको नुसती जीवाची उठाठेव |
बरचळतील काही करतील बाऊ अफवांचे फुटतील पेव |
होऊ दे चर्चा ......येऊ देत मोर्चा
प्रतिकार करण्या सोबतीला उभा राहीन मी...
सोडतील साथ सवंगडी अन विरोधात उभे ते आपलेच |
निंदा करतील आप्त जैसे दात अन ओठ ही आपलेच |
करू दे अपमान ..... करू दे कटकारस्थान
अभेद्य भिंत तुजपुढती उभा राहीन मी...
हसतील काही खदाखदा अन देत नुसत्या फुसक्या सूचना |
असे करा वा तसे करा पण दाखवा सगळीच नवी पुनर्रचना |
देऊ दे भाषणे ....ऐकवू दे प्रवचने
आहेस तूच अचूक सांगत उभा राहीन मी...
हरवतील लोक विश्वास अन उभे पेरतील किल्मिष मनी अशांत |
करतील विचलित तुला सदाच अन बुद्धीत शंका, विचलन भ्रांत |
बोलू दे रे....... असेच डोलू दे रे
निश्चिंत अटल अविचल सोबती उभा राहीन मी...
- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment