कसला हा प्रकार ?

कसला हा प्रकार ? 19/9/15

काय हा गोंगाट आणी कसला यांचा निर्लज्जपणाचा कळस |
बेभान, बेधुंद, टल्ली सुमार कार्यकर्ते मनात आणतात किळस |
 

वर्गणीचा घाट नेहमीचा करीत येती म्हणेल तीच पावती फाडा |
नावाने देवाच्या अधिकृत झालाय काय जणू रोजचाच हा राडा |

आरतीपुरते सौजन्य दिसते आणी बाकी सार येथे गढूलाच पाणी |
तोंडात मावा, खिशात बाटली, पत्तेही आणी चालती बेसुमार वाणी |

का रे देवा पुढ तुझ्या हा दरवर्षी दिखाव्याचा होतो नंगा नाच |
शंकाच येथे स्वत: लोकमान्य ही लावू शकले असते का टाच |

सांगा टिळक मला तुम्ही का यासाठी केलात हा सार्वजनिक |
दुभंगली गल्ली गल्ली पुरती,विभागले हर गाव मंडळागणिक |

होवो एकता, यावा सद्भाव अन एक राष्ट्रभावना ही जागावी |
होऊ दे इतकेच दिवसात दहा मागणी मी अजून काय मागावी |
   
                                             -- सचिन गाडेकर

Comments