कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?

तू नदी तर मी सागर आहे
तू ओढा तर मी गागर आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
तू ट्यूब तर मी टायर आहे
तू बल्ब तर मी वायर आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
तू रात्र तर मी जागर आहे
तू औषध तर मी आजार आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
तू भाजीपाला तर मी बाजार आहे
तू फटाके तर मी बौछार आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
तू चूल तर मी अंगार आहे
तू पत्रेवाला तर मी भंगार आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
तू म्यान तर मी तलवार आहे
तू जनता तर मी सरकार आहे |
कस सांगू मी तुला तू माझ्यासाठी कोण आहेस?
- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment