सन्मान राखणार कोण? १०/१/१६

सन्मान राखणार कोण? १०/१/१६


झिजतो दिवा रोज, संपवत स्वत:स तेल न जळते वात |
सूर्य मिळो जगतास प्रभाती कारणी स्वतःस संपवते रात |
जो चालतो जागतो तुम्हाकरी त्याचा सन्मान राखणार कोण?


घेतो मुल्य परी झीझवीत काया, ओतीतो जीव गुरुराज |
देणारा ही नम्र बनावा अगदी, न करता इंचभर सा माज |
पिढी, राष्ट्र, देश घड्वय्या त्याचा सन्मान राखणार कोण?


व्हावा सन्मान अदबीने, ना रेटावी जीभ कधी अपमानी |
द्यावे कान ऐकण्या सबबी, का सदा कदा बेछूट मनमानी |
शांत, संयमी, निर्मम, निरागसतेचा सन्मान राखणार कोण?


होईल बदल मग निसर्गासम अलबत सोडूनी स्वभावास |
देव जाणे कोण दायित्व स्वीकारेल मग संपूर्ण पराभवास |
या अजेय, अविजित, अमेय योध्याचा सन्मान राखणार कोण?

--सचिन गाडेकर

Comments