पानगळ.... ३१/१/१६
पानगळ.... ३१/१/१६
(काल एका अश्वत्थ वृक्षाला पानगळ होताना पाहिलं ...निवांत रात्री ९ ची
वेळ , अंधार आणी वारा ...स्वतः हा वृक्ष राजा स्वतःची होणारी पानगळ जणू अश्रूंनी
पाहत होता. गळणारी पाने जणू टाहो फोडत होती ... त्याची असहायता अन आशा दोन्ही
दिसल्या . मन चर्रर झालं ...अन लेखणी सुरु झाली )
ऋतू बदलाचा फटका राजा तुलाही असा अटळ |
किती वेदनांनी सोसावी तू दरसाली ही पानगळ |
पाहिली मी बेबस अन लादलेली एक अवस्था |
विसर जुने, पांघरून नवे, ही घोर क्रूर व्यवस्था |
विस्तीर्ण बलदंड बुंध्यातही तुझ्या छेद वारुळाचे |
नमन झुकून किडे मुंग्यांना अन आव्हान वादळाचे |
गळताना पाने करुण आभासी ऐकला तुझा टाहो |
कवटाळतोय तू जन्म मरण विस्फारून
दोन्ही बाहो |
दूर उडाली पर्णे काही, कवेतच काही देत कठीण वेदना |
निष्ठूर कठोर सा भासला विधाता मज गमावत संवेदना |
का सोसावे तू हे नरक भोग अन नवी पालवी आशा |
उमगले इतुकेच भाव मनी अन बोलू पडली भाषा |
Comments
Post a Comment