करतात बळकट अश्रू
करतात बळकट अश्रू शिकवीत धडा ओझरत्या जीवना |
बोलते वाट दु:ख भरी प्रकट नयनातून वेदना |
नजर हळवी अन गद्गद करत ओघळते संवेदना |
धरावा धीर थोडा अन व्हावे बळकट दणकट मना |
करतात बळकट अश्रू शिकवीत धडा ओझरत्या जीवना |
झरतात झरे वाहत लोटत पाट बोलक्या या भावना |
लपवावे वा प्रकट करावे सगळे सांगावे कुणा कुणा |
सावरले मन परी गाली सोडत जाती निशब्द पाऊलखुणा |
करतात बळकट अश्रू शिकवीत धडा ओझरत्या जीवना |
करावे दाटलेले मन ही मोकळे सम दाटलेल्या घना |
सांभाळावा की वाकू द्यावा अगदी मोडेल इतका कणा |
लढावे,रहावे उभे, संघर्ष करावा, न सोडावा श्वास रणा |
करतात बळकट अश्रू शिकवीत धडा ओझरत्या जीवना |
ना द्यावा दोष कुणा ना, धरावे डूख कधी जीवना |
व्हावे आत्मचिंतन, संयमभाव, सिंहावलोकन साधना |
शिकावे, चलावे, ना थांबावे, पूर्ण करावे हरेक संसाधना |
करतात बळकट अश्रू शिकवीत धडा ओझरत्या जीवना |
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment