पोटतिडीक आणि खरा सायन्सप्रेमी....
पोटतिडीक आणि खरा सायन्सप्रेमी....
सकाळी रोजच्या प्रमाणे शाळेत पोहोचलो. नेहमीप्रमाणे परिपाठ पूर्ण होत होता. थोडेसे सामान्यज्ञान पूरक प्रश्नावली झाली. शेवटी एक निरोप आला. आमचे कॉलेजचे प्राध्यापक श्री. अजिंक्य कुलकर्णी सर हे आले व त्यांनी परिपाठ झाला की ५ ते ८ चे मुले काही वेळासाठी मला हवेत हे सांगितले. मला चटकन आकलन झाले आज पुन्हा पर्वणी आहे मुलांना.
मी विचारले की काही खास प्रयोजन असे विचारले तर एक आर्त स्वराने सर म्हणाले दोन गोष्टी आहेत. आज आईन्स्टाईन यांचा स्मृतिदिन आहे आणि ग्रेट शास्त्रज्ञ स्टीफन हॉकीन्स इज नो मोर | बातमी ऐकताच सगळे शिक्षक हळहळले. नकळत तोंडातून शब्द आले की ग्रेट लॉस टू वर्ल्ड.
एक सायन्स शिकवणारा शिक्षक आणि सायन्स चा उपासक किती हळहळतो हे मी पाहत होतो. किती तळमळ की हे असे कळताच मुलांपर्यंत गेलं पाहिजेत. अजिंक्यसर म्हणाले की यासाठीच हे मुलांपर्यंत गेलं पाहिजे. लगेच एक वर्गात मुलांना रवाना केले.
अजिंक्यसर यांनी मुलांना लगेच किमान २० मिनिटे आईन्स्टाईन आणि स्टीफन हॉकीन्स सांगत सगळं कसं भारावून टाकलं. मुद्दाम त्या ऑडियोची ललिंक देखील शेयर करत आहे. काय इच्छाशक्ती आहे की जमेल तितकं आणि जमेल तेवढं जास्त देत राहायचं. आजच्या काळात आजची पाटी टाकून दिवस पार करणारे शिक्षकगण यांना एक आदर्श आहेत अजिंक्यदेव तुम्ही. कौतुक यासाठीच कारण नेहमी भेटणं आणि बोलणं यातून आपल्याला आपल्याच माणसाची किमत कळत नाही म्हणून मुद्दाम आज हा पोष्टीचा उपद्व्याप.
असो, तुम्ही असेच देत रहा भाई. खरा हाडाचा, मांसाचा आणि खऱ्या शिक्षणाचे लेणं असलेला शिक्षक जिवंत ठेवा आजन्म आणि आम्हास असेच inspire करत रहा.
लिंक पहिल्या कमेंट्स मध्ये आहे.
Comments
Post a Comment