अजूनही गुलदस्त्यात
अजूनही गुलदस्त्यात ....26/3/18
ओढावली खगी किंचित छटा नारंगी अन लाल |
अडखळली अरुणाची उदयगामी निरंतर चाल |
उगवेल का तो पुन्हा एकदा ठेवाया बडदास्त |
अजूनही अजूनही गुलदस्त्यात ||
ना चिवचिवाट अन थवे परतेना चित्र का बद्हाल |
ना रंगत पंगत, ना गंमत जंमत वृक्ष वेली बकाल |
बांधेल का घरटे पुन्हा सुगरण विहिरीत दुरापास्त |
अजूनही अजूनही गुलदस्त्यात ||
मशागती ना मेहनती, माजल्या तनावर खुरपणी |
तुडतुडी, अळी, मानमोडीना करेना कोणी फवारणी |
पिकवेल का बळी माणिकमोती झोकूनी बिनधास्त |
अजूनही अजूनही गुलदस्त्यात ||
ना जोश ना दम सभोवती फक्त अंगोअंग थकवा |
आजारी पुर्जे, निकामी गुर्दे, अर्ध्या देहावर लकवा |
होईल चिकित्सा अन उपचार ही वाटेल जबरदस्त |
अजूनही अजूनही गुलदस्त्यात ||
__Sachin Gadekar
Comments
Post a Comment