शांतता ...फक्त कोर्टाच काम चालू आहे. २६/१०/१८

शांतता ...फक्त कोर्टाच काम चालू आहे. २६/१०/१८

एवढ्यात कितीही ठरवलं की लिहू नये आजकालच्या मुद्यांवर तरी लिहावच लागतं. काल परवा शांत बसलो तर मनात विचारांचा धुमाकूळ झाला. कल्लोळच माजला म्हणावा. मनात विचार घोंगावत होते की  काही आजच्या आणि येणाऱ्या पिढीला आम्ही काय देत आहोत ? कोणते विचार आजकाल आपल्या अवतीभवती फिरत आहेत? किती विक्षिप्त क्रिया आणि प्रतिक्रिया ऐकावयास मिळत आहे.

आता पहिला मुद्दा डोक्यात मंडई मरत होता तो सणवार यांचा. आजकाल प्रत्येक सणवार आला की पांचट जोक सुरु होतात. किमान काही ठिकाणी, काही सांस्कृतिक बाबींना किमान लाज आणि आदर बाळगत सन्मान दिला पाहिजे. कोणताही उत्सव असो तर लगेचच फालतू विनोद सुरु होतात. आत दडून बसलेली भिकार सर्जनशीलता इतरत्र बाहेर आली तर काय हरकत आहे? पण मूल्य आणि भावना यात गुंफलेले उत्सव काय आहेत हे मूढ बुध्दीला कसे समजावणार? सगळ्याच ठिकाणी फालतू ओक करत निर्बुद्ध असल्याचे प्रदर्शन करावेच असा काही नियम आहे का? याच अर्धवट लोकांना त्या उत्सवाबद्दल एक थेट प्रश्न जरी केला न तरी भंबेरी उडेल. सगळंच कसं काय मजाक बनू शकेल बरे?

बरं सणवार म्हटले सण आणि एखादा कोर्टाचा उद्देश हे जणू समीकरणच झाले आहे. एक सण असा जात नाही ज्यात सामाजिक बांधिलकीने आणि जाणिवेतून काही घडत आहे. कोर्टाला तसेही फक्त कायदे कळतात आणि श्रद्धा, भावना केंव्हाच चुरगळया जाताहेत असे भासते. त्यात अपेक्षित असणारे सामाजिक भान देखील कोणी दाखवायला तयार नाही. मग ते फटाके असो वा कर्णकर्कश डीजे. राजकीय मंडळी फक्त आता कोर्टाचा आदेश पाळू याचा उच्चार करताना दिसत आहे.  त्यात तत्सम भिकारचोट राजकारणी यांच्या गटारावाणीतून बाहेर पडणारी घाण तर ऐकवत देखील नाही. कोणताही सण विना वाद विवाद का साजरा होत नाही? स्वत:हून का आम्ही सामाजिक जाणिवा उभ्या करू शकत  नाही? त्यात मग पुढे येते मुजोरी. या अश्या आदेशातून जन्माला येते अर्वाच्य भाषा. यातून फक्त वाढीस लागते अवमान आणि अपमान करण्याची वृत्ती. मग ते उच्च  न्यायालय असो वा अगदी सर्वोच्च न्यायालय. जर सगळं काही न्यायालय आणि न्यायव्यवस्था ठरवणार असेल तर मग लोकशाहीची मंदिरे फक्त पोपट राहतील असे वाटते. इथे न्यायव्यवस्था आणि न्यायमंदिराला हस्तक्षेप करण्याची वेळ येते हाच पराभव आहे.

उत्सव निखळ आनंद देण्यासाठी होते असे म्हणायची वेळ आली आहे कारण फक्त ऐकू येतात ते नकारात्मक सूर. न्यायालय हि व्यवस्था असून मजबुरी नक्कीच नाही हे देखील समजावे लागेल. मग अगदी डीजे असो वा फटाके.

--- सचिन गाडेकर

Comments