आजही.... ती ८/३/२०२०

आजही.... ती   ८/३/२०२०

ती घरात आहे, ऑफिसात आहे
पदावर आहे, जबाबदारीत पण आहे
आणि तीच  स्वयंपाक घरात ही आहे
आणि रोजच्या अथक कामातही आहे

ती फेसबुकवर आहे, whatsap वर आहे
ती ट्विटर वर आहे, ती tiktok वर पण आहे
आणि तीच  कायम धुणीभांड्यात आहे
ती रोजच्या अबोल धोबीकामात आहे .

ती विधानसभेत, विधानपरिषदेत आहे,
तो आता लोकसभेत, राज्यसभेत  पण आहे
आणि तीच खिचपत  कुंटणखाण्यात आहे
राजरोस अनिच्छेने देहव्यापारात आहे

ती मुक्तछंदी विहरत बागडत आहे
ती सबरीमाला,  शनी मंदिरात पण आहे
आणि तीच निर्भया, दिशा कोपर्डीत आहे
ऑनर किलिंग रेप आणि acid हल्ल्यात आहे.

 ती आज हृदयात आहे मनात आहे
अगदी शाळा कॉलेजच्या पुस्तकात आहे
आणि तीच भरदिवसा जळीतकांडात आहे
तीच वंशाच्या दिव्यासाठी भ्रूण हत्येत आहे

ती आरक्षणात आहे, पदोन्ननीत आहे
ती सभेत आहे, भाषणात आहे
आणि तीच पुरुषापेक्षा कमी मानधनावर आहे
तोकड्या कपड्यानिशी कवरपेजवर आहे

ती शब्दात, भाषेत सिनेमात आहे
ती अनेक  पुरस्काराच्या रांगेत आहे
आणि तीच स्वतःशी वियोगात आहे
समानतेच्या जंजाळात असमानतेत आहे.

जागतीक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा

--- सचिन गाडेकर

Comments