कोविड कथा
कोविड
कथा
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
दिसतंय डोळ्यांनी स्पष्ट की संकट हे दीर्घकाळ असणार आहे
ठावूक नाही कुणासही अजून किती काळ घरीच बसणार आहे
मग बातम्या,
पुस्तके,छंद, कुटुंबीय फक्त
सोबती उरणार आहे
सोडूनी अवडंबर सारे जो तो यंदा जगण्यास शिकणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
कथा कसल्या हो फक्त वेदना आणि यातनाच बाहेर पडणार आहे
कसे समजावू एका विषाणू अख्खी प्रजा देशोधडीला लावणार आहे
होते नव्हते गाठीशी
बांधले झटक्यात एका असे धुवून नेणार आहे
स्वप्ने अन मनसुबे लाखो निर्दयी काळ पुन्हा एकदा चिरडणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
हातचा रोजगार गेला देव जाणे आता उद्या काय शिजवून खाणार आहे
निघाला आहे तो पायीच मग त्याला कोण आंजरणार गोंजारणार आहे
वेठबिगार मजूरच तो त्याला कुठे विमानाने थेट घरी पोहोचवणार
आहे
जगला वाचला तर परत नामुष्कीने का तो परत इकडच येणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
नाहीत सगळेच घरात बऱ का सेवा अत्यावश्यक सुरूच राहणार आहे
वीज,
पाणी अन अन्नधान्य पुरवठा सगळा अगदी सुरळीत होणार आहे
ठेवून चिमुकल्या लेकाराला घरी माय ऑफिसात हजेरी लावणार आहे
लेकरू ही मग कधी येईल घरी ती एकच आस लावून बसणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
काही योद्धे तर आज ही म्हणे विना पीपीई कीट युद्ध लढणार आहे
राम किंवा रहीम भरोसे ते कर्तव्य विना चुकता पार पाडणार आहे
का धर्मांध हरामी लुच्चे भडवे काही या देवदूतांवर थुंकणार
आहे
नराधम काही विसरून मानवता आजही दगडफेक करणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
लढतील कोविड योद्धे दिवसरात्र ते जीवानिशी युद्ध लढणार आहे
उदार जीवावर होत दररोज लढवय्ये कर्तव्य ते बजावणार आहे
सैनिक सीमेवरील आणि पांढऱ्या वेशातला फरक नसणार आहे
पूजिले देवादिक खूप आजवरी आता यांनाच देव म्हणणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
सणवार,
दंगल असो वा कोविड येथे मामा ड्युटीवरच दिसणार आहे
तहान भूक स्वास्थ्य विसरून अथकपणे तो उभाच ठाकणार आहे
रक्षण हेच कर्तव्य त्याचे घेतली शपथ तो सदैवच राखणार आहे
मी उभा आहे तुमच्यासाठी ‘तुम्ही फक्त घरी रहा आहे’ मागणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
हातातली नोकरी ज्याची एकमेव मिळकत होती ती बहुदा जाणार आहे
संस्थाचालक म्हणे आता अडचणीमुळे मनुष्यबळच कमी करणार आहे
पगार तर लगेच कमी
झालेत आणि भूज किल्लारीसा भूकंप होणार आहे
बऱ झालं ना सरकार किमान लाख वीस कोटींची नवी भरारी देणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
कोणी म्हटलं जरी आकडा पहा रुग्णाचा तर ते तुलना करणार आहे
पहा इतर देश कसे अडकलेत, अरे आपण लवकर मात देणार आहे
सुजाण जनमानस तर आपणहून उंबरठ्याच्या आतच रहाणार आहे
उपटसुंभ येडे काही मात्र लाठी खात कोरोना वाटत फिरणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
सरकारे इकडे तिकडे लाखो कोटी अन्नधान्य लगेचच वाटणार आहे
चार दाने गरजूंना वाटून एकदा जो तो अख्खे श्रेय लाटणार आहे
आम्ही केलं आम्ही केलं आम्हीच केलं जो तो बोंबा मारणार आहे
कोणी टीव्ही तर कोणी फेसबुकवर युद्धाचे इथे ज्ञान वाटणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
सवय जाहली ऑनलाईन खरेदी आता बहुदा थोडेफार घटणार आहे
मॉल,
सेंटर बंद होता कॉर्नरचा व्यावसायिकच आता आठवणार आहे
देशी की विदेशी कंपनी ही फरक ज्याला त्यालाच करावा लागणार
आहे
देशातला पैसा देशातच रहावा ज्याने किमान प्रश्न काही सुटणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
केवळ खुल्या मद्यविक्रीने म्हणे राज्याचे अर्थगणित सुटणार
आहे
घरात बसला ४० दिवस थेट तो आता उन्हात उभा ठाकणार आहे
सोशल डीस्टन्सिंग म्हणजे काय हो कोण आता समजावणार आहे
का अश्या धोरणांनी सांगा बरं भंगलेली अर्थव्यवस्था सावरणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
आधी छायाचित्र नंतर मदत असा जो तो मदतगार बनणार आहे
मदत दिली की भिक दिली अविर्भाव चेहऱ्यावर असणार आहे
करावी मदत मान सन्मान राखुनी कधी प्रजा का समजणार आहे
संतोष,
समाधान अंतरी व्हावा आनंद बस हाच भाव पुरणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
होती राबत आधीपासूनच ती आता निरंतर तास चोवीस राबणार आहे
माझी आई,
बहिण, कन्या, पत्नी, आजी या नव्या
ओझ्याने वाकणार आहे
आज मग हे बनवा ते ही बनवा फर्माइशी आदेश एक एक सुटणार आहे
जणू किचनचा पसारा सारा कधीच न संपणारा अक्षय भाता होणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
बाह्यांग पाहता जीव सदा जो अचानक असा अंतर्मन शोधणार आहे
मी का असा मी का तसा नक्कीच आतला आवाज खोजणार आहे
का विसंबावे इतरावर मार्ग वाटचालीचे यापुढे स्वत: योजणार
आहे
फार झाला गोंधळ बाहेरी आता अंतर्ध्यानी निशब्द तो बोलणार
आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
पटले मनाला एवढेच की हा नव्याने विचार करावा लागणार आहे
का खावी एक भाकरी,
जेव्हा ठीकठाक अर्धीनेच पोट भरणार आहे
नक्की आहे कोविड हा जुन्या पाउलखुणा बेलाशक पुसणार आहे
पाहिले जे आजवर जग ते पुन्हा असे पूर्ववत कधीच नसणार आहे
आम्ही उभं आयुष्य ह्या कोविड कथा अनेक पिढ्यांना सांगणार
आहे
---डॉ
सचिन शंकर गाडेकर
Comments
Post a Comment