विंचू चावला...... ९/७/१६
सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा डोंगर ....
आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार ...
आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार ...
(सर्व भारुडी)
अग अग अग .... विंचू चावला
देवा रे देवा ...
बया बया बया ..
आयो आयो आयो ...
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
दुष्काळाचा विंचू चावला
...नरदेह हैराण झाला...त्याने माझा प्राण चालला...
अग अग अग .... विंचू चावला
(भारुडी 1 )
ही इंगळी अतिदारुण ...
(किती दारुण?) लई दारुण...
लई जहाल... या इंगळीचा दंश करी
बेहाल...
(भारुडी २) बर गड्या हे
सांग तुला विंचू चावला तरी कोणचा?
भारुडी 1) मला विंचू चावला
तो या दुष्काळाचा...
(भारुडी २) अबबबब....
दुष्काळाचा? त्यो अन कसा? कुठं ? कधी?
(भारुडी 1) मग ऐका नीट....
अग अग अग .... विंचू चावला
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
(भारुडी 1 )
या आटपाट नगरात...(या
आपल्या नगरात?) होय होय आपल्याच आटपाट नगरात...
आलिया दुष्काळाची लाट (खरच
गड्या ...लाट...)
सोडून सारी कामं बसलीत
tanker ची पहात वाट (थांब जरा मी पाहून येतो ..)
(आला का tanker? )
(आज दहावा दिवस ...पाणी
उद्या येणार आहे...आज नाही.)
जो तो बोलू लागला...देवा
काय केल म्हणू लागला...
(सर्व )अग अग अग .... विंचू
चावला
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
(भारुडी 1 )
केली वृक्षतोड बेशुमार ....(काही
सुमार नाही हो या वृक्ष तोडीला...
माजला चहूकडे हाहाकार (रांगाच्या
रांगा...एकदम राशन दुकानाएवढ्या... )
मग प्यायला पाणीच नाही .... होती जीवाची लाही लाही
जो तो बोलू लागला...देवा
काय केल म्हणू लागला...
(सर्व )अग अग अग .... विंचू
चावला
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
(भारुडी 1 )
शिकवण संताची विसरलो
(म्हणजेच आम्ही हुशार झालो..)
निसर्गावरच घसरलो (फोडा
टेकड्या, बांधा घरे....)
विठ्ठला आता कसे कळावे अन कुणामागे पळावे ....
जो तो बोलू लागला...देवा
काय केल म्हणू लागला...
सर्व )अग अग अग .... विंचू
चावला
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
(भारुडी 1 )
देवा तुझी तुळशीमाळ (आहे ना
गळ्यात....)
काय सांगतो श्रावणबाळ
(जमणार नाही आपल्याला ...)
ना झाडे, ना वेली, आला कसा
अवघडसा हा काळ (भोगा आता मग काय ..)
जो तो बोलू लागला...देवा
काय केल म्हणू लागला...
सर्व )अग अग अग .... विंचू
चावला
काय मी करू? विंचू चावला
कुणाला सांगू? विंचू चावला
अग अग अग .... विंचू चावला
.... विंचू चावला ....
विंचू चावला .... विंचू चावला ..हो...
चला करू उपाय (आधी सुरवात
तू कर बर..)
चालवू जरा हातपाय (बर...अजून
काही ?)
धाय मोकलून रडतीय आपली काळी
माय...(अगदी खर बोललास राजा..)
(सर्व )व्हय गड्या....काहीतरी
कराया पाहिजे....
हा दुष्काळाच्या विंचुवर
काही मात्री असेल ना पण....
(भारुडी १)
लावा झाडं, वाढवा झाडं अन करा
सृष्टीचा लाड (एकदम बरोबर पठ्ठ्या ..)
देईल सुख तो पाडुरंग अन
होईल सारं ग्वाड (विठुराया ...तूच सांभाळ रे बाबा ..)
साकडं विठुराया तुजला बरसू
दे मेग यंदा जीवापाड ...
हो जीवापाड.... अगदी
जीवापाड...
मग कसा उतरेल डंख या
इंगळीचा ...
(सर्व) याला म्हणतात
माणूस....चला तर.... या बालगोपालासोबत हा निर्धार करू अन या दुष्काळावर मात
करूया...
मग तर म्हणा सगळे...
(सर्व )अग अग अग .... विंचू
चावला
काय मी करू? विंचू चावला
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment