अहंकाराचा वारा न लागो राजसा
अहंकाराचा वारा न लागो राजसा | २३/८/१६
तू असशील बलाढ्य मेरू पर्वतसमान
होऊनी गर्विष्ठ हरवशील स्वत:चे भान
जाती झाडे महापुरे, न लव्हाळे लहान
नम्रता, शिष्टतेचे ठेव अमोल एकच दान |
तू असशील विशालकाय जहरी एक सर्प
नष्ट होते सर्वस्व हरवत मुंग्या समोर दर्प
भरते जलाशय परी सांभाळी वाहते उपसर्ग
अतिभयंकर डायनासोरही बनतो नष्ट जमाती वर्ग |
तू असशील चतुर,कपटी. कल्पक, नेमका हुशार
उसके वहा देर है अंधेर नहीं बडा यही विचार
ना शमवी भूक तहान जलधी ठरतो इथे बेकार
वाटा खारीचा उचले चिमुकली ती अजरामर खार |
होता गर्विष्ठ कैलासदमनी अजिंक्य रामरीपू रावण
सारथ्य करत जगद्नियंता बनतो प्रभू मनभावन
दगड धोंडे अन शिवप्रेम पुरते घाली जन्मा खिंड पावन |
ना तोफा न रणगाडे बंदुका परी बात घडवी मनोमिलन
--सचिन गाडेकर
Comments
Post a Comment