भाग २ - राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार

भाग २ - राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार .. २७/८/१६

व्हावा अभ्यास अन वाचन अवांतर बसून तास न तास |
भरवावा लाडाने पिल्लूला प्रेमाने मोजून प्रत्येक तो घास |
भेटावे सवंगडी निवांत चघळत विषय काही तेच ते खास |
बसावे एकटे काही काळ  घेत मागोसा कसा सरला हा मास | 
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........

धरावे पुस्तक हाती दिसेल ते अन पुरववा वाचनचा तो छंद |
चाळावी डिक्शनरी अन वेबदुनिया अगदी मनसोक्त अनिर्बंध |
खेळावे पत्ते,चंपल पाणी,चीचुके,सापशिडी लुटत मनमुराद आनंद |
गप्पा गोष्टी,कथाकथन तर कधी अंताक्षरी खेळत बसावे स्वानंद |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........

एकटे बसावे एकट्याने घालवावा एकट्याशी एकटा थोडा वेळ |
बोलावे स्वत:शी स्वत:ने जमेल तसा  स्वत:च घालावा मेळ |
करावे मंथन, चिन्तन, मनन, भजन कधी ध्यानधारणा निर्भेळ |
जोडावा, घट्ट करावा निभवावा अचूक बुध्दी भावनेचा  खेळ |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........

व्हावा थोडा आराम ही मग दुपारी जेवून भले झोपावे ढाराढूर |
नको डाएट,उपवास वगैरे खावे प्यावे जोरदार तजेलदार भरपूर |
रंगावे दिवसागणिक ऐसे सांजेला सर्वांना लागावी भलतीच हूरहूर |
वेचावा,द्यावा, वाटावा आनंदची मनोभावे अविश्रांत सर्वदूर |
पण राहून जातंय बरच काही असून सुट्टीचा वार ........

                       --- सचिन गाडेकर

Comments