सचिन गाडेकर सर- माझ्या आयुष्याला मिळालेला परीस स्पर्श
सचिन गाडेकर सर वाढदिवस विशेष
सचिन गाडेकर सर- माझ्या आयुष्याला मिळालेला परीस स्पर्श
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन सर. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती ज्यांना आपण भेटतो तो प्रत्येक व्यक्ती आपल्याला आयुष्याविषयी खूप काही शिकवून जातो. काही व्यक्ती तर आपल्या आयुष्याला कलाटणी देऊन जातात, तशीच एक व्यक्ती म्हणजे सचिन सर. माझ्या जीवनावर बऱ्याच व्यक्तींचा प्रभाव राहिला पण या सर्वांमध्ये जर कोणी मला सर्वात जास्त प्रभावित केलं असेल तर ते तुम्ही सर.
असं म्हणतात की आयुष्यात व्यक्तीने नेहमी सकारात्मक राहायला हवे, पण ही सकारात्मकता आयुष्याचा बिकट परिस्थितीत बऱ्याचदा साथ सोडते, पण काही ठराविक व्यक्ती ज्या कधीही हार मनात नाही , अशीच एक व्यक्ती म्हणजेच सर. आयुष्यात प्रत्येक क्षण कसा एन्जॉय करायचा आणि त्यामधून स्वतः आणि इतरांची कशी करमणूक करायची हे जर शिकायचं असेल तर सरांपेक्षा चांगला गुरु मिळणे अशक्य. नेहमीच हसत मुख राहून आयुष्यात आलेल्या अडचणींचा सामना करणे किंबहुना त्यांचा समाचार घेणे हे शिकलोय सर मी तुमच्या कडून. माझी सर्वात मोठी उणीव म्हणजे माझा राग आणि संयम, परिस्थितीला सामोरे जाताना मी नेहमीच उद्विघन राहायचो त्यातूनच राग हा कायमच उफाळून आलेला असायचं ज्याचे चटके माझ्या सहवासातील प्रत्येकाने सोसलेही असतील, घरातील व्यक्ती सोडून जर माझा राग इतर कोणी खिलाडूवृत्तीने सहन केला असेल तर ते तुम्हीच सर. मी नेहमी उतावीळ राहून आयुष्याला सामोरे जायचो, आणि त्यामुळे मला व इतरांना देखील त्रास सहन करावा लागायचा. पण सरांच्या सहवासात आल्यापासून राग हा नाहीसा झाला, आणि आयुष्यातील कोड्यांची उत्तरे शोधण्यासाठी'संयम' नावाचे विशेष अस्त्र हि मला सरांकडून मिळालेल वरदान.
सरांची आणि माझी भेट हि प्रथमतः ' संजीवनी अकेडमी ,ला झाली, आणि त्यासाठी मी संजीवनी चा आजीवन ऋणी राहील. कारण माझ्या गंजलेल्या आयुष्यात सरांचा परीस स्पर्श त्यामुळेच शक्य झाला. संजीवनी मध्ये सर आणि आमच्या गॅंगच्या अनेक आठवणी आहेत ज्या कधीही विसरल्या जाणार नाहीत. सरांचं इंग्रजी, संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषेवरील प्रभुत्व हे आजही मला भुरळ घालत. आयुष्यात सदैव तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न राहील, शक्य होईल की नाही माहित नाही पण प्रयत्न नक्कीच सोडणार नाही.
माझ्या पडतीच्या काळात माझ्या सोबत सदैव एक मोठा भाऊ बनून उभे राहिले, स्वतः च्या आयुष्यात अनेक अडचणींना सामोरे जात असताना देखील ज्यांनी कधीही स्वतःचा आणि माझा धीर खचून दिला नाही त्याबद्दल सर तुमचे ऋण मी कधीही विसरू शकणार नाही. आयुष्यात ज्यावेळी सर्वानी पाठ फिरवली त्यावेळेस जे कोणी 'मैं हूं ना ' म्हणून माझ्या सोबत उभा राहिला असेल तर ते तुम्ही सर.
लिहिण्यासाठी बरेच काही आहे, आणि मी कितीही लिहिले तरी ते कमीच पडेल याचीही मला जाणीव आहे. आजच्या या विशेष दिवशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, ईश्वर तुम्हाला उदंड आयुष्य देवो, आणि अशाच प्रकारे तुम्ही आनंदाचा इंद्रधनुष्य बनून अवकाश पटलावर चमकत राहावे हीच परमेशवर चरणी प्रार्थना.
काही चुकले असेल तर माफ करावे
तुमचाच,
इसाक.
Comments
Post a Comment