" सचिन गाडेकर वाढदिवस विशेष "
" सचिन गाडेकर वाढदिवस विशेष "
मला चांगले आठवतय मी दहावीत होतो त्यावेळी तुम्ही 'विद्यापिठातुन' नुकतेच आला होतात. त्यावेळी फारशी ओळखही नव्हती आपली. तुम्हाला आठवत नसेल पण एक गोष्ट सांगतो,मी SYBsc ला असेन त्यावेळी मी तुमच्या घरी राहात्याला काॅलेजवरुन यायचो. मग तुमच्या घरा समोरच्या गोठ्यात तासनतास् चालत असलेल्या गप्पा मला आजही आठवतात. मी एकदा सलग तीन दिवस काॅलेज 'बंक' मरून आलो कारण गप्पांचा विषय चालु होता 'कार्ल मार्क्स'. मार्क्स च्या विचारांवर मार्क्स चा अभ्यासावर तुमची मजबूत पकड आहे. मार्क्स का उदयाला आला, त्याच्या विचारांच्या मर्यादा काय होत्या? ह्यात ते तीन दिवस कसे गेले हे कळालचं नाही. Actually हे तुमच्या तोंडुन ऐकणे हा मला त्या १८/१९ वर्षी मोठा बौद्धिक खुराक वाटला.
यथावकाश DBT च्या माध्यमातून आपली मैत्री घट्ट होत गेली त्याला अजुन बळ देण्याचे काम केले ते वाचनाने.तो एक काॅमन पाॅईंट असावा बहुतेक. मागच्या दोन वर्षापूर्वी अख्खं एक वर्ष तुमच्या सोबत काम करायची, तुमच्या सोबत जेवताना विविध विषयांवर होणारी खलबतं मजा आणणारी होती. त्या शाळेचा मूर्खपणा झाला नसता तर आजही एकत्र असतो आपण. तुम्हाला सिंबायोसिस ला व मलाही परत माझ्या जुण्या काॅलेज ला परतण्याची वेळ आली नसती. तर ते असो. भाई, तुमच्या कविता,तुमचे छोटे मोठे लेख हे वाचताना मलाही हे असं तोडकंमोडकं लिहायची उभारी दिली ती तुम्ही. So thank you so much for everything.
अरे भाई का बड्डे वाजले बाराsss, अारा र रारा अारा र रारा खरतनाक!
Wish you a many many happy returns of the day.
Comments
Post a Comment