करावे काय?
करावे काय? ६/७/15
करावा नमस्कार वाकून वा जोडावे हात कोपरापासून |
धरावा हाथ सैतानाचा वा सोलून काढावे ढोपरापासून |
वाढतच चाललाय दिनमासी अघोरी उन्माद यांचा |
खुळेपणाला लाजवेल हो असला खुळा नाद यांचा |
अर्थहीन फोलके सारे पसरी नुसताच फुफाटा वावधान |
निखळतील तारे बहुमोल अन होतील दूर खरे विद्वान |
करू घातले यत्न खोटे व्हावे अवजड काही अवघड |
निरस आणी निरर्थक भाषा, सोबती निर्व्याज बडबड |
प्रजा होतीच आंधळी म्हणा आता राजा ही झाला लहरी |
संपेना रात विलंबी येथे बघा अंधारी दळतेय म्हातारी |
झाकून नयन निर्णय सारे आणी करताय भला अन्याय |
आरंभ असा तर नकोच कल्पना कसा होतो शेवटचा अध्याय |
- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment