आषाढी वारी

आषाढी वारी 22/7/15

व्हावा हेवा स्वर्गलोका अशी आषाढाची वारी |
अलोट सोहळा मुक्तीचा कसा देवाचिया दारी |

अवघा महाराष्ट्र वेडा नाम मुखात पांडुरंग |
निघाला आषाढीला, झाला नामघोषात दंग |

लळा देवा तुझा वैष्णावांना असा चालवतो |
जमतो मेळा चन्द्रभागी कसा वाळवंट फुलवतो |

पायपीट,कीर्तन,प्रवचन मुखी अखंड हरिपाठ |
ध्यास एक भास एक व्हावी विठ्ठलाची गाठ |

वाजे मृदृंग चिपळी पखवाज अन खणखणते टाळ |
सरतो नकळत बघा कसा हजार मैलाचा हा काळ |

पंगती संगती पाऊली खेळती पारणे फेडते रिंगण |
अनुपमेय सोहळा डोळी भक्ता देती देवच आलिंगन |

भोळ्या भाबड्यांचा देव तू आम्ही तुझे मांडलिक |
दे आशीर्वाद फक्त व्हावे लाडका तुझा पुंडलिक |
                     
                                        -- सचिन गाडेकर

Comments