संपला वनवास हा......

संपला वनवास हा......

 
संपले मार्ग इथले एकदाचा संपला जीवघेणा  प्रवास हा ।
यातना रोजच्या हरामी या एकदाचा संपला वनवास हा ।

 
सुटली नोकरी हक्काची नशीबी आला भयंकर त्रास हा ।
शत्रुस ही न मिळो देवा अयशस्वी  विषारी गळफास  हा ।

नको भीक मागणे पाठी लागणे नको फालतू ध्यास हा |
पुरे झाला आशा अपेक्षेचा निर्लज्ज सरकारी  हव्यास हा |

 
छळ म्हणा वा म्हणा शोषण हिरावला तोंडचा घास हा |
सडलेल्या कुजलेल्या अन भयाण भ्रष्ट मनोवृत्तीचा वास हा |

 
बरे झाले थांबला तरी मृगजळाचा खोटा आता विपर्यास हा |
गमावला मी कायमचाच सरकारी यंत्रणेवरचा विश्वास हा |

                                  - सचिन गाडेकर 

Comments