दिल दोस्ती दुनियादारी.

दिल दोस्ती दुनियादारी........ 19/7/15
 

उगवला रविवार बहुसकाळी पटपट झाली सगळी तयारी |
होती मनी सर्वांनाच लागली आस भेटीची भलती न्यारी |

उठा गड्यानो करा लगबग सूचना झाली जनहित में जारी |
आवराआवर फोनाफोनी झाली मग रथ येऊन ठाकला दारी |

आले सवंगडी कथित वेळेने  पोहोचले उशिराने बारी बारी |
जो तो ऐटीत सजला धजला तर काही नटलेले भारी भारी |

प्रवास मजेतच गप्पा रंगल्या यजमान स्वागती करून तयारी |
थांबेनाच आग्रह खानपानी तो कसे मग झाले पोटोबा बेजारी |

लिंबू तोड वा गुलगुले म्हणा खुरमा खादाडखाऊ आमची यारी |
लावा तीट काळी कुणी आपली अशी दिल दोस्ती दुनियादारी |

                                   - सचिन गाडेकर

 

Comments