रविवार..... रविवार.....

रविवार..... रविवार.....

यावा वारंवार असला गड्यांनो मजेशीर रविवार ।
झोप मनसोक्त आराम पुरा, काम पुरते हद्दपार ।

उगवला अरुण निवांत, उठे आरामात सरकार ।
खावे, प्यावे चटपटीचे, चहापान जोरदार ।

स्नान ही मग सवडीने, करीत नियम ही बेकार ।
जणू हसतहसत प्रियतमेला कळवावा नकार ।

मित्रमंडळी चॅटचुट करती, कुठे सिनेमाची बहार ।
कोणी प्रभाती शेतामध्ये सहज करे विहार ।

मेकअप करती सेल्फी काढीत करतयं कोणी कहर ।
कळतचं नाही कसा संपतो तिसरा ही   प्रहर

मन ही थोडे हलके हलके मिस करु लागते यार
करुनि तयारी पक्की होते उद्यासाठी तैयार ।

कळूच नये दर आठवडी संपला कसा रविवार ।
उरू नये उसंत क्षणाची नसावा आनंदा पारावार ।
 
                             - Sachin Gadekar

Comments