दुर्दैव देशाचे....
दुर्दैव देशाचे.... 30/7/15
संध्येला गुरुपौर्णिमेच्या अंतिम अध्याय लिहिला कलामांनी |
निष्पाप अन निर्दोष ठरवले येथे निर्बुद्ध सैतानास गुलामांनी |
शब्द ऐकू की वाचू पुस्तिका करू पालन काय काय एपीजेंचे |
वाटली हिंसा अन क्रूरता शशीस, तोडले तारे परत अकलेंचे |
बुडाला होता दिवस रात्र शोकमग्न सागरकाठी भावूक रामेश्वर |
आटापिटा अन दयायाचना दरबारी जगाला अशांत भूषण रात्रभर |
सलाम दिला लाखोंनी आणी विनम्र घेतला पाठ जगण्याचा घडण्याचा |
भाईजान ट्वीट ,पत्र व्यवहार कुठे, यत्न being human बनण्याचा |
मोजावे काय कर्तृत्व, म्हणावी काय गती नाग त्रिशूल अग्नीबाणाची |
भुंकला पुन्हा धर्मनिरपेक्ष समूह अन नाळ जोडली धर्माशी सैतानाची |
का घडणार हेच, का उत्तर हेच, किती सोंग क्लिष्ट सापेक्ष पेचाचे |
विसरले कलाम सारे अन आला याकूब मुखी का हेच दुर्दैव देशाचे |
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment