मैत्री अन चहाचे झुरके 27/5/17
मैत्री अन चहाचे झुरके 27/5/17
आज आमच्या विशाल रावांचा हैप्पी बर्थडे आहे. त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या. त्याची आठवण नेहमीच निघते म्हणा. सकाळी सकाळी चहा घेत असतांना अचानक काही जुन्या आठवणी विशालच्या हैप्पी बर्थडे मुले जाग्या झाल्या. ह्या आठवणी आम्ही चार रूममेट म्हणजेच मी, विशाल, योगीराज हितेंद्र आणि लाका म्हणजेच आप्पा.
पुण्यात शिक्षणासाठी गेलो आणि ओघानेच रूम घेणे आले. दैवच की आम्ही चौघे ही कसलीही पूर्व ओळख नसतांना एकत्र आलो आणि एक डबल रूम पाहिली. सकाळी रूम आवडली आणि संध्याकाळी लगेच ताबा घेत सामान शिफ्ट केले. आपापले कॉर्नर ज्याने त्याने निवडले आणि पथाऱ्या टाकल्या.
सगळ आवरून आसपास मेस कुठे आहे हे पाहुन झाले. आसपास पी.एम. टी. बस स्थानक कुठे आहे हे झाले. सर्वात महत्त्वाचे आसपास अमृततुल्य मिळण्याचे ठिकाण. विशालची आठवण यासाठी की तो ठरवायचा की चहा कुठे घघ्यायचा. किमान थोडे लांब जावे लागले तरी हरकत नाही पण वेळ असेल तर चहा चामुण्डा येथेच मिळावा. सकाळी घाई झाली तर जवळपास घेऊन जाण्याचा आग्रह ही त्याचाच.
कॉलेज जवळ फारसे काही मिळत नव्हते तसे पण शेजारी मस्जिद होती तिथे एक चहाची टपरी वाला सापडला आणि तो सोबती झाला. अनेक वेळा तिथे सहज बसून गप्पा आणि नवे मित्र बनत गेले. वेळ दिला की छोटासा चहाचा कप देखील खूप सार देऊन जातो. शिक्षण घेता घेता हे जुळलेले ऋणानुबंध अजबच आहेत. मिथून, गुप्ताजी जरी रुममेट नव्हते तरी जिवलग झाले ते या अशा छोट्या छोट्या भेटीतून.
बरं यात आमचे योगीराज चहाला विष मानत त्याचा धिक्कार करत. बाबा रामदेव आणि त्या साठी लढनारा योगी झाला तो. त्या मागे असणारी काळजी लपून नव्हती सुदधा. हितेंद्रने दिलेले सल्ले सुद्धा आयुर्वेदिक असत. आम्ही चौघे अभ्यास आणि झोप या दोन्ही गोष्टी तंतोतंत पाळल्या. आप्पा तर शब्द विकत दिल्या सारखं बोलत असे. त्यात दर दुसऱ्या शब्दात लाका ...लाका...आणि लाका. उदा. आरं काय लाका, तू लाका, मला लाका फोन लाका नाही केला लाका.
सांगवीत तर खुप सारे दिवस असेच व्यतीत झाले. रूम म्हणजे अड्डा असते सर्वासाठी. नंतर बाबा हितेंद्र छोटा गॅस घेऊन आले आणि चहापान आतच सुरू झाले. त्यात एकदा हितु ने बाबा रामदेव ब्रँड चे चहा पॅकेट आणले आणि आमची चहा ची सवय आयुर्वेदिक करून टाकली. अभ्यास केला आणि थकवा, कंटाळा आला तर पेटवा गॅस आणि हवे ते करा.
असो, अनेक आठवणी आहेत. विशाल तू, आप्पा आणि हितेंद्र सगळं विसरला नसाल अशी अपेक्षा आहे.
पुन्हा एकदा विशाल ला हार्दिक शुभेच्छा.
-- सचिन गाडेकर
Comments
Post a Comment