सुरेख आणि सरल भाग १


किती अबोल आणि मोजकेच शब्द मोजत थेट मन जिंकून मैत्री खुलवणारे फारच तुरळक. तुम्ही त्यातले एक. एक म्हणजे एकमेव. मैत्री म्हणजे गप्पा, टप्पा, उशिरापर्यंत वेळ एकत्र घालवणे, वेळोवेळी छोटे मोठे गेट टुगेदर वगैरे प्रकार न होता देखील मैत्रीचा धागा घट्ट केलाय तो एक आविष्कारच म्हटला पाहिजे किंवा त्या नात्याचे नशीबच.
सुरवात होते ती एका प्रकट भेटीनंतर. एक प्रभारी प्राचार्य आणि एक मुलाखत देणारा उमेदवार अशी शुष्क आणि सीमित ओळख. तद्नंतर रुजू होऊन सर्व काही सुरळीत होते हे सुद्ध क्रमप्राप्त. कधी कधी अस वाटते की किती कालखंड हळूच पसार झाला या गर्तेमध्ये. एका स्वभावाची, विचाराची माणसे मित्र बनतात असं सगळे शास्त्र घोकून घेतात मग तो न्याय देखील इथे फोल झाला वर्षभर.
माझा वर्ग जसा वर्ग झाला तसा हा सगळा गोतावळा जुळून आला. माझ्या काळजाच्या तुकड्यांना तश्याच भावाने अगदी हातावरील फोडाप्रमाणे जपत अवघे वर्ष पार पाडलेत. अभिमान ही वाटतो की वार्षिक बाजी देखील तुम्हीच मारलीत असेम्ब्ली मध्ये. स्वत: लावलेली बीजे जेव्हा वटवृक्ष होत उंचावतात तेव्हा होणारा आंतरिक आनंद अतुलनीय आणि फक्त अवर्णनीय. एका एका धाग्याला अगदी तसच गुंफल तुम्ही. माझ्या एका एका जीवाला तसाच जीव लावला तुम्ही. माझ्या एका एका पक्ष्याला खरं घरट दावलत तुम्ही. हे तर मी हजारदा म्हणेन की हे ऋण अनेक जन्म विसरणार नाही हा बाबा. कुठही गेला तरी या उभ्या जगतात.
असो, तद्नंतर अनेक वेळा get lost, दगड असे शब्द ऐकत आणि त्या मागचे अविर्भाव समजून त्यात एक मजा घेणारे महान लोक आपण. कामातील वेळ कसा पसार होतो हे कळत देखील नाही पण त्यात सूद्धा होणारा एखादा एन्कौन्टर देखील पुरेसे ठरते विश्वास मिळवायला आणि घट्ट करायला. अर्थात कधी कधी मोबाईल आणि मेसेजच्या पुढे नाते मान टाकते हे देखील खरे. ही जुडलेली कडी अजून घट्ट होत जावी अन त्यात याच पवित्र आणि सोज्वळ, स्वच्छ नात्याला भरारी मिळते हे त्या विधात्याचे सूचन नाही का? एका सरळ, प्रामणिक आणि सहज असणारे व्यक्तिमत्व समजून घेतांना देखील भन्नाट आनंद जाहला. 

Comments