शेतकरी आहे तो ..

शेतकरी  आहे तो ...कष्टकरी आहे तो...
त्याला साला म्हणा, येडा म्हणा , भिकारी म्हणा अथवा बळीराजा म्हणा त्याची परिस्थिती बदलणार आहे का?
वाढणारा अन्न उत्पादन खर्च आणि नेहमीचा न मिळणारा भाव याचे गणित जो पर्यंत सुटत नाही तो पर्यंत कुठलेही बिरुद दिले तरी शेतकरी आणि त्याच्या समस्या सुटणार नाही.
बरं हमीभाव देणारे भाव देऊन उपकार करण्याची भाषा करतात की काय?
शब्द जपून वापरावे लोक प्रतिनिधी आणि विशेषतः त्यांनी ज्यांना संधी दिलीय 15 वर्षांनी याच राब राब राबणाऱ्या भूमिपुत्र शेतकरी लोकांनी.
जीभ घसरली अथवा रूढ शब्द वापरला हा वाद नाहीच मुळी.
अजूनही वेळ गेलेली नाही, या राजाला फक्त एक गोष्ट द्या ....त्याचा आवाक्याबाहेर जाणारा उत्पादन खर्च कमी होईल असे करा अन त्याने पिकवलेल्या सोन्याची माती होणार नाही एवढीच व्यवस्था करा.
बाकी तो काळ्या मातीत बियाणं फेकून जुगार खेळणारा कोणाच्याच पुढे मिंधा होणार नाही.
सन्मान नसेल करायाचा ठीक आहे पण त्याला अभद्र बोलत त्याची आधीच ढासळलेली मानसिकता अजून खराब करू नका, त्याला साथ द्या आणि आम्ही आहोत लेका सोबत तुझ्या सुख-दुःखात असे कृतीतून दाखवा.
असो , हा पाठ सर्वासाठी एकच आहे , सत्तेत आहेत वा बाहेर, सगळे एकाच माळेचे मणी.
बळीराजा तू मात्र कष्ट करत रहा, आपला संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे.
अभिमान आहे एक शेतकरी असल्याचा.

--- सचिन गाडेकर

Comments